कोरेगाव: सांगली जिल्ह्यातील रायगाव येथील केन अॅग्रो लिमिटेडने कोरेगाव तालुक्यातील शेतकर्यांच्या ऊसाचे पेमेंट एङ्गआरपी प्रमाणे न दिल्याने शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, माजी तालुका प्रमुख बाळासाहेब ङ्गाळके यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले. अखेरीस कारखान्याने शेतकर्यांना त्यांच्या ऊसाचे पेमेंटचे चेक दिले, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
केन अॅग्रो लिमिटेडने कोरेगाव तालुक्यातून गेल्या वर्षी आणि याही वर्षी मोठ्याप्रमाणावर ऊस गाळपासाठी नेला होता. त्याचे वेळेत पेमेंट केले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. एङ्गआरपीप्रमाणे पेमेेंट देण्याबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले होते. शेतकर्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, माजी तालुकाप्रमुख बाळासाहेब ङ्गाळके यांच्या नेतृत्वाखाली शंभरहून अधिक शेतकर्यांनी शुक्रवारी कडेगावचे तहसील कार्यालय गाठले. सुरुवातीला तहसीलदार सौ. अर्चना शेटे यांना निवेदन देऊन शेतकर्यांच्या मागण्या मांडल्या, त्यांनी कारखाना व्यवस्थापनाच्या अधिकार्यांना पाचारण केले, मात्र अधिकारी पेमेंटबद्दल काहीच बोलत नव्हते. शेवटी संतापलेल्या शेतकर्यांनी तहसिलदारांच्या दालनामध्ये ठिय्याच मांडला. रात्री उशिरापर्यंत प्रशासन कारखाना व्यवस्थापनास शेतकर्यांच्या पेमेंटबद्दल सांगत होते, मात्र निर्णय काही होत नव्हता. शेतकरी आपल्या मागणीवर अडून राहिल्याने अखेरीस रात्री 11 च्या सुमारास उपस्थित शेतकर्यांना कारखान्याच्या अधिकार्यांनी दि. 14 सप्टेंबर 2019 ही तारीख टाकून पेमेंटचे चेक दिले. जे शेतकरी आले नाहीत, त्यांच्या खात्यावर त्याचदिवशी पेमेंट जमा केले जाईल, असे आश्वासन दिले.
तहसिलदारांनी राजकीय दबाव झुगारुन काम केल्याने कोरेगाव तालुक्यातील शेतकर्यांना न्याय मिळाला आहे. तहसिलदारांच्या भूमिकेचे ेविलास कदम, विश्वास शिंदे, संग्राम चव्हाण, पृथ्वीराज कदम, मारुती कदम, शशिकांत ङ्गाळके आदी शेतकर्यांनी कौतुक करुन धन्यवाद दिले आहेत.
कडेगाव तहसील कार्यालयात शेतकर्यांचे ठिय्या आंदोलन
RELATED ARTICLES

