कोरेगाव: शासकीय चाचणी लेखापरीक्षणामध्ये निष्पन्न झालेल्या 30 कोटी 78 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा पुढील तपासासाठी सातारा येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या संबंधीचे आदेश काढले असून, त्या अनुषंगाने कोरेगावचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे व त्यांच्या पथकाने संस्थेचे मुख्य कार्यालय, शाखा कार्यालय सील करुन कागदपत्रे जप्त केली आहेत. जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांच्या आदेशानुसार शासकीय अपर लेखापरीक्षक कु. राणी घायताडे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात शासकीय चाचणी लेखापरीक्षणामध्ये निष्पन्न झालेल्या 30 कोटी 78 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी ङ्गिर्याद दि. 22 ऑगस्ट 2019 रोजी दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गोडसे हे करत आहेत.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशानुसार सदरील गुन्ह्याचा तपास सातारा येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांच्यासह सहाय्यक ङ्गौजदार वसंतराव साबळे, प्रल्हाद पाटोळे, हवालदार केशवराव ङ्गरांदे, महिला पोलीस कर्मचारी शीतल रासकर यांनी शासकीय अपर लेखापरीक्षक कु. राणी घायताडे यांच्या उपस्थितीत पतसंस्थेचे मुख्य कार्यालय आणि कोरेगाव शाखा कार्यालय सील केले. शनिवारी दुपारी पतसंस्थेची कार्यालय उघडण्यात आली, तेथून कागदपत्रे जप्त करुन, त्याचा पंचनामा करण्यात आला.
दत्तदिगंबर पतसंस्थेचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे
RELATED ARTICLES