Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीअमर रसाळ यांना तहसीलदारपदी पदोन्नती

अमर रसाळ यांना तहसीलदारपदी पदोन्नती

कोरेगाव: येथील प्रांताधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले नायब तहसीलदार अमर रसाळ यांना तहसीलदारपदी पदोन्नती मिळाली असून, त्यांची नियुक्ती पुणे येथे सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
रसाळ हे पंढरपूर (जि. सोलापूर) येथील रहिवासी असून, त्यांनी नायब तहसीलदार म्हणून शासकीय सेवेत प्रवेश केला. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील कूळकायदा शाखा, वडूज तहसील कार्यालयात त्यांनी नायब तहसीलदार म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे.
गेल्यावर्षी त्यांची कोरेगाव प्रांताधिकारी कार्यालयात नियुक्ती झाली होती.
राज्य सरकारने राज्यातील 75 नायब तहसिलदारांना तहसिलदारपदी पदोन्नती दिली आहे, त्यामध्ये रसाळ यांचा समावेश आहे.
त्यांचे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, महसूल उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, ठाणे येथील प्रांताधिकारी अविनाश शिंदे, प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, तहसीलदार रोहिणी शिंदे, नायब तहसीलदार श्रीरंग मदने, सुयोग बेंद्रे यांच्यासह महसूल कर्मचारी संघटनेने अभिनंदन केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular