कोरेगाव: कोरेगाव तालुक्याचा विकास हेच ध्येय घेऊन कामकाज करत आहे. तालुक्याच्या प्रत्येक वाडीवस्तीवर ठोस आणि दर्जेदार विकासकामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भविष्यात तालुक्याचा सर्वांगिण विकास करणे हाच ध्यास असून, त्यादृष्टीने पावले टाकली जात आहेत, असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
भीमनगर-दरे, ता. कोरेगाव येथे 27 लाख 69 हजार रुपये खर्चुन करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेचे भूमिपूजन आ. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी पक्षप्रतोद अविनाश फाळके होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्रीताई फाळके, पंचायत समिती सदस्य डॉ. निवृत्ती होळ, भीमनगरचे सरपंच सुरेश कांबळे, दरेचे सरपंच आनंदराव जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आ. शिंदे पुढे म्हणाले की, भीमनगर-दरे या गावाने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीसह मित्रपक्षांना नेहमीच भरीव मदत केली आहे, किंबहुना पाठबळ दिले आहे. या परिसरातील जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत, आम्ही विकासकामांच्याबाबतीत कमी पडलेलो नाही. या गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी 27 लाख 69 हजार रुपये खर्चुन करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अविनाश फाळके यांनी भीमनगर-दरे ग्रामस्थांची एकी वाखाण्याजोगी आहे. या गावाने नेहमीच विकासाकामांना साथ दिली आहे. या परिसराच्या विकासासाठी काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून आम्ही नेहमीच कटीबध्द आहे, असे निदर्शनास आणून दिले.
सरपंच सुरेश कांबळे यांनी स्वागत केले. दरेचे सरपंच आनंदराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. ग्रामसेविका लोहार यांनी आभार मानले.
कोरेगाव तालुक्याचा सर्वांगिण विकास हाच ध्यास : आ. शशिकांत शिंदे
RELATED ARTICLES

