Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीकोरेगाव येथील सराईत गुन्हेगार सनी काकडे जिल्ह्यातून तडीपार

कोरेगाव येथील सराईत गुन्हेगार सनी काकडे जिल्ह्यातून तडीपार

कोरेगाव: कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सनी राजू काकडे वय 21, याला पोलिसांच्या प्रस्तावावर प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सौ. कीर्ती नलावडे यांनी दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महसूल प्रशासन आणि पोलीस दलाने गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा ठोस निर्णय घेतला असून, रात्रगस्ती दरम्यान कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदीद्वारे गुन्हेगार ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.
कोरेगाव ग्रामीण रुग्णालयानजिक असलेल्या गोसावी वस्तीतील रहिवासी असलेला सनी राजू काकडे याच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे शारिरीक, आर्थिक स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तो प्रमुख गुन्हेगार असल्याने त्याच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव कोरेगाव येथील प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहाय्यक ङ्गौजदार वसंत साबळे, प्रल्हाद पाटोळे यांनी दाखल केला होता. या प्रस्तावर जलद सुनावणी घेण्यात आली. काकडे हा सर्वच बाबतीत दोषी असल्याने, प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कीर्ती नलावडे यांनी त्याला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश काढले आहेत. सहाय्यक ङ्गौजदार प्रल्हाद पाटोळे यांनी तात्काळ नोटीस बजावून सनी काकडे याच्यावर तडीपारीची कारवाई केली.
कोरेगावातील गुन्हेगारी मोडीत काढणार : सुनील गोडसे
कोरेगाव शहर आणि परिसरात कायदा-सुव्यवस्था चोख रहावी, यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली असून, कर्मचार्‍यांना तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणार्‍या अपप्रवृत्तींवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जात आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोरेगाव परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढली जाणार आहे, त्यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular