कोरेगाव : भोसे (ता.कोरेगाव) येथे आईबरोबर कशाला भांडण करता, याचा जाब विचारणार्या मुलावर वडिलांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मंगळवार दि. 7 मे रात्री 10 च्या सुमारास शामराव दौलत कांबळे हे पत्नी शिला हिच्याबरोबर भांडण करत होते, त्यावेळी मुलगा संतोष म्हणाला की, आईशी कशाला भांडता, त्यावर शिवीगाळ करत माझी जमीन आहे, माझे घरदार आहे असे म्हणत चिडून जाऊन शामराव यांनी कोयत्याने संतोष याच्या उजव्या कानावर आणि पाठीवर वार केले. संतोष याला सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक मिलिंद कुंभार तपास करत आहेत.
भोसे येथे एकावर कोयत्याने वार
RELATED ARTICLES