Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीकोरेगावात रोड रोमियोंवर निर्भया पथकाकडून कारवाईचा दंडुका

कोरेगावात रोड रोमियोंवर निर्भया पथकाकडून कारवाईचा दंडुका

कोरेगाव: कोरेगाव शहरातील कॉलेज सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी पोलिसांच्या निर्भया पथकाने सडक सख्याहरींवर (रोड रोमिओ) कारवाईचा दंडुका उगारला आहे. बुधवारी सकाळी सार्वजनिक ठिकाणी युवतीचा विनयभंग करणार्‍या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ट्रीपल सिट् ङ्गिरणार्‍या दुचाकीस्वारांवर मोटार वाहन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली. पाच विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी दोनच दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे निर्भया पथक प्रमुखांची विशेष बैठक घेऊन कॉलेज सुरु होण्याच्या पार्श्‍वभूमीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड, निरीक्षक सुनील गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश राठोड यांच्या पथकाने बुधवारी डी.पी. भोसले कॉलेज रस्त्यावर निर्भया पथकाद्वारे कारवाईचा दंडुका उगारला होता.
डी. पी. भोसले नजिक नाना-नानी पार्कसमोर युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी सोमनाथ उध्दव बर्गे, रा. वेताळगल्ली-टेक, कोरेगाव याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच ट्रीपल सिट्स ङ्गिरणार्‍या दोन दुचाकीस्वारांवर मोटार वाहन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली. पाच विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांच्या पालकांना याबाबतची माहिती कळविण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकातील कर्मचारी हेमंत शिंदे, तुषार आडके व शिल्पा जाधव यांनी ही कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईमुळे सडक सख्याहरी (रोड रोमिओंचे) धाबे दणाणले आहेत. सोमनाथ बर्गे याच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक सनी आवटे करत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular