Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीवीजबिलांच्या थकबाकीदारांना महावितरणचा शॉक; सातारा जिल्ह्यात 1838 वीजजोडण्यांची बत्ती गूल

वीजबिलांच्या थकबाकीदारांना महावितरणचा शॉक; सातारा जिल्ह्यात 1838 वीजजोडण्यांची बत्ती गूल

सातारा : जिल्ह्यात सातत्याने वीजबिलांची थकबाकी ठेवणार्‍या व वारंवार आवाहन करूनही थकीत रकमेचा भरणा न करणार्‍या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 1838 ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे. यामध्ये 1188 थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे.
दरम्यान थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत स्थानिक वीजबिल भरणा केंद्र दि. 23 व 24 फेब्रुवारीला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. याशिवाय घरबसल्या मऑनलाईनफ पेमेंटसाठी महावितरणची अधिकृत वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.
गेल्या पंधरवड्यापासून सातारा जिल्ह्यात महावितरणकडून थकबाकीदारांविरुद्ध मोहिमेद्वारे कठोर कारवाईला सुरवात झाली आहे. या मोहिमेत अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा अधिकारी व हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. वीजग्राहकांकडे महावितरणच्या मासिक वीजबिलांचा एक रुपयाही थकीत राहणार नाही या ध्येयाने ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. थकबाकीचा भरणा न झाल्यास कोणत्याही परिस्थितीत संबंधीत थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडितच करण्याचे निर्देश सर्व अधिकारी व जनमित्रांना देण्यात आलेले आहेत.
गेल्या काही महिन्यांतील वाढत्या थकबाकीची गंभीर दखल घेऊन थकबाकी वसुलीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभाग व शाखा कार्यालयनिहाय थकबाकी व होणारी वसुली याचे दैनंदिन पर्यवेक्षण वरिष्ठ पातळीवरून सुरु करण्यात आले आहे.
घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये थकबाकीदार असणार्‍या सातारा जिल्ह्यातील 1838 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये 1188 जणांचा कायमस्वरुपी तर 650 जणांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीदाराने अनधिकृतपणे वीजवापर केल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे. चालू व थकीत वीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्रांसह ुुु.ारहरवळीलेा.ळप ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे मऑनलाईनफ सोय उपलब्ध आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular