Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीमसूर येथिल दिक्षीत संगीत विद्यालयात दिवाळी पहाट उत्साहात

मसूर येथिल दिक्षीत संगीत विद्यालयात दिवाळी पहाट उत्साहात

मसूर:मसूर ता.कराड येथील दिक्षीत संगित विद्यालयात शिष्यगणांनी सादर केलेली दिवाळी पहाट विविध भावगीत व भक्तीगीतांच्या सुरेल गायनाने संपन्न झाली.यावेळी मसूरचे सरपंच पंकज दिक्षीत यांची प्रमुख उपस्थिती होती.
मसूर व परिसरात संगीत क्षेत्रात नामांकीत तबला वादक,हामोंनियम वादक व गायक तयार व्हावेत या हेतून ह.भ.प.मुधकर दिक्षीत यांनी दिक्षित संगीत विद्यालय सुरू केले आहे.
या विद्यालयात दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी मधुकर दिक्षीत, मोहन सासवडे मसूरकर, सुभाष पाखले उंब्रज, दिपक दाभाडे रिसवड, ओंकार थोरात हणबरवाडी, अभिजीत सासवडे, शेखर वेल्हाळ मसूर, बाळासाहेब पाटील, शिवाजी चव्हाण मिस्त्री कोणेगांव, वैशाली दिक्षीत मसूर, अनिकेत इंगळे,लखण कांबिरे कांबिरवाडी, दयानंद चव्हाण, राजेंद्र जाधव खराडे, जगन्नाथ कुंभार कवठे इत्यादी गायकांनी गायलेल्या ओंकार स्वरूपा,तुझे रूप चित्ती राहो, उठ पंढरीचा राजा, देहाची तिजोरी,मन लागो रे लागो इत्यादी भावगीते, तसेच दिवस तुझे हे ङ्गुलायचे,या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, पंढरीचा महिमा, कानडा राजा पंढरीचा, असा कसा देवाचा देव अशा विविध भक्तीगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
सदर कार्यक्रमास चैतन्य दिक्षीत, किशोर दिक्षीत तसेच दिक्षीत परिवारातील सर्व सदस्य व रसिक श्रोते मोठया संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत व आभार दिक्षीत संगीत विद्यालयाचे प्रमुख मधुकर दिक्षीत यांनी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular