Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीकंडक्टरच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे शालेय विद्यार्थीनींना नाहक त्रास

कंडक्टरच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे शालेय विद्यार्थीनींना नाहक त्रास

मसूर: 29 नोव्हेंबर रोजी लाहोटी कन्या प्रशालेच्या मसूर मार्गावरील विद्यार्थिनींना एका कंडक्टरच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे नाहक त्रास सहन करावा लागला याबद्दल संबंधित सर्व विद्यार्थिनींनी मसुरचे आगार व्यवस्थापक यांना आपल्या तक्रारीचे निवेदन दिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की 29 नोव्हेंबर 2019 रोजी नेहमीप्रमाणे 5 वाजून 10 मिनिटांनी शाळा सुटल्यानंतर लाहोटी कन्या प्रशालेच्या सुमारे 15 ते 20 विद्यार्थिनी कराडच्या कृष्णा नाक्यावर एस.टी.ची वाट बघत सुमारे एक ते दीड तास उभ्या होत्या.
दरम्यान कराड कोरेगाव एस.टी बस क्रमांक एम एच 14 बीटी 0350 ही बस 6 वाजून 15 मिनिटांनी कृष्णा नाक्यावरती आली. बस मोकळी असतानाही ड्रायव्हरने ती न थांबवता पुढे पळविली आणि पुलाजवळ थांबविली. दरम्यान गाडी थांबली म्हणून उभ्या असलेल्या मुली गाडीच्या पाठीमागून सुसाट धावत गेल्या परंतु त्यांना गाडीत जागा असतानाही कंडक्टरने मुलींना गाडीत घेण्यास नकार दिला त्याचबरोबर गाडी मोकळी असतानाही मुलींना गाडीत न घेता दार खाडकन बंद करून घेतले आणि सुसाट वेगाने गाडी निघून गेली.
दरम्यान या प्रकाराने धास्तावलेल्या मुली म्हणाल्या की, आम्हाला रोज येथे तासंतास एस टी ची प्रतीक्षा करत उभे राहावे लागते. त्यामुळे घरी गेल्यावर कंटाळा येतो. अभ्यास होत नाही. 10वी, 12 वी च्या परीक्षा जवळ आल्या आहेत. बस लवकर मिळाली नाही तर खूप टेन्शन येते. समाजातील सर्व घटकांना आमची विनंती आहे की आम्हाला वेळेत बसेस मिळतील यासाठी प्रयत्न करावेत. तसेच एस टी च्या कंडक्टर, ड्राईव्हर यांनी आपल्याच मुली समजून आम्हाला वागणूक द्यावी. आम्ही लवकर घरी पोहोचलो म्हणजे आमच्या पालकांचेही टेन्शन दूर होईल.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular