Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडी‘वाघेश्वर शाळेस कराड तालुक्यातील पहिली वाय फाय शाळा होण्याचा मान’

‘वाघेश्वर शाळेस कराड तालुक्यातील पहिली वाय फाय शाळा होण्याचा मान’

मसूर: आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकावे या उद्देशाने जिल्हा परिषद शाळेने शाळेत वायफाय बसवल्याने वाघेश्वर शाळेस कराड तालुक्यातील पहिली वाय फाय शाळा होण्याचा मान मिळाला असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे यांनी केले. ते वाघेश्वर (ता.कराड) येथे मसूर बिट अंतर्गत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी माजी सभापती शालन माळी, पं. स. सदस्य रमेश चव्हाण गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर शिक्षण विस्ताराधिकारी चंद्रकांत निकम केंद्रप्रमुख सिकंदर संदे, नसीमा संदे, मुख्याध्यापक संघाचे संचालक जगन्नाथ कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जगदाळे पुढे म्हणाले जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी संगणक साक्षर झाला पाहिजे यासाठी सर्व ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगातून संगणक देण्यासाठी सूचना केल्या होत्या त्यानुसार सर्व शाळांमध्ये संगणक मिळाले आहेत.
सातारा जिल्ह्याची शैक्षणिक परंपरा जपण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार व शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. शिक्षकांनीही खेळाबरोबरच विद्यार्थी गुणवत्तेत कसा पुढे जाईल याकडे तळमळीने लक्ष दयावे.
यावेळी गट शिक्षणाधिकारी अधिकारी मुजावर मॅडम म्हणाल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळ हा महत्त्वाचा असून जो विद्यार्थी खेळात चमकतो त्याचा बुद्ध्यांक सुद्धा चांगला असतो यावर्षी तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये कुस्ती व बुद्धिबळ या दोन नवीन स्पर्धा सुरू झाल्या आहेत यामध्ये तालुक्यातील सर्व शाळांनी भाग घ्यावा.
खेळाबरोबरच शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी यावेत व तालुक्याची परंपरा अबाधित राखावी यासाठी शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज असल्याचे सांगितले. सदस्य रमेश चव्हाण म्हणाले माध्यमिक शाळेसारखा जिल्हा परिषद शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाची पदवी घेतलेला शिक्षक नसतो त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळ शिकवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते भविष्यात यासाठी काय करता येईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
सूत्रसंचालन अशोक जगदाळे यांनी केले. प्रस्ताविक मुख्याध्यापिका मंगल शेवाळे यांनी केले तर आभार शिक्षण विस्ताराधिकारी चंद्रकांत निकम यांनी मानले कार्यक्रमास कराड पाटण शिक्षक सोसायटीचे माजी अध्यक्ष संजय शेजवळ, शाळा समिती अध्यक्ष सुरेश शिरसागर तसेच शिक्षक व शिक्षिका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular