मसूर: येथील इंदिरा कन्या प्रशालेत नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थीनींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प व पेन देऊन इ. 5 वी व इ. 8 वीतील विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सनदी अधिकारी रमेश हिंदुराव जगदाळे अध्यक्षस्थानी होते, ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, महेशचाचा जगदाळे, ग्रामपंचायत सदस्या शुभांगी जगदाळे,श्रध्दा लॅबोरेटरीचे बापूसो जगदाळे, मुख्याध्यापक पी.आर. पाटील, बाजीराव माने, विनायक बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात रमेश जगदाळे यांनी शाळेच्या पहिल्या दिवसाचे महत्व विशद केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, मुख्याध्यापक पी आर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.बाजीराव माने यांनी गरीब व होतकरू मुलींना शालेय साहित्याचे वाटप केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस एन पवार यांनी तर आभार प्रदर्शन ए बी पाटील यांनी मानले.
इंदिरा कन्या प्रशालेत नवागतांचे स्वागत
RELATED ARTICLES