मसूर: मसूर (ता. कराड) येथील वैभव शरद पवार (मुळगाव तारगाव) याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2018 मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले. त्याची मंत्रालयाच्या सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड झाली असून या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वैभव लहानपणापासूनच शांत, संयमी, जिद्दी व कष्टावर अपार श्रद्धा असणारा असल्यामुळेच त्याने हे यश संपादन केले आहे. या यशात त्याचे सर्व शिक्षक, आई-वडील व बहिण या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. या अद्वितिय यशामुळे त्याचे मसूर जि. प. सदस्य मानसिंगराव जगदाळे, कोरेगावचे माजी पंचायत समिती उपसभापती कांतीलाल पाटील, मसूरचे सरपंच पंकज दिक्षीत, ग्रामपंचायत सदस्य तसेच यशवंत विद्यापीठ कराडचे अध्यक्ष शिरीष किणीकर, सचिव बी.टी किणीकर, राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक संभाजी पवार, सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक मधुकर सोमासे, पत्रकार दिलीप माने यांनी अभिनंदन केले.
बहिण-भावाचे यश….
वैभव याची बहीण कु. श्वेता शरद पवार हिने गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले असून ती सद्या कराड नगरपालिकेत कर निर्धारण अधिकारी म्हणून कार्यरत आहे. दरम्यान स्पर्धा परीक्षेत बहीण-भावांचे यश हे उदाहरण दुर्मिळच म्हणावे लागेल. परंतु वैभव आणि श्वेता यांनी जिद्दीच्या जोरावर अभूतपूर्व असे यश मिळविल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून याची चर्चा मसूर व पंचक्रोशीत सुरू आहे.
वैभव पवार याची मंत्रालयाच्या सहाय्यक कक्ष अधिकारीपदी निवड
RELATED ARTICLES