Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडी‘कर्तव्य’च्या माध्यमातून महिलांना मोफत शिलाई मशिन वाटप

‘कर्तव्य’च्या माध्यमातून महिलांना मोफत शिलाई मशिन वाटप

मेढा: मौजे ग्रापंचायत गांजे येथे 14 वित्त आयोगातून महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण झाले. महिलांना हाताला काम मिळावे. छोटासा व्यवसाय मिळावा यांसाठी कर्तव्य सोशल ग्रुप यांच्या मार्फत जावलीचे आमदार श्रीमंत छत्रपती श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले सौ. श्रीमंत छ्त्रपती वेदांतीकाराजे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने गांजे पंचक्रोशीतील सर्वच्या सर्व 40 प्रशिक्षित महिलांना मोफत शिलाई मशिन वाटप करण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी जि.प. सदस्या अर्चनाताई रांजणे, पं.स. सदस्य विजयदादा सुतार साफल्या संस्थेच्या अध्यक्षा संगिता वेंदे उपस्थित होते. महिलांना एकत्र करून महिलांसाठी जास्तीत जास्त गावची कामे करावयाची एखाद्या कामाचा सतत पाठपूरावा करून काम आपल्या पंचक्रोशीगावात घेऊन आणल्या बद्दल अर्चनाताई रांजने यांनी गांजे सरपंच लक्ष्मी चंद्रकांत चिकणे यांचे कौतुक केले.
बचत गटामार्फत महिलांना कशा प्रकारे गावातील महिलांची प्रगती करता येईल या विषय मार्गदर्शन केले. संगिता वेंदे यांनी गावातील पुढील नवीन कामे करण्यासाठी सरपंच लक्ष्मी चिकणे यांना गावातील महिलांकडून कशा प्रकारे मदत करून गावची व महिलांची प्रगती करता येईल याविषय मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत गांजे ग्रामसेवक माने यांनी सूत्रसंचलन केले.पंचायत समिती सदस्य विजयदादा सुतार यांनी सर्व ग्रामस्थ महिलांचे आभार मानले. कार्यक्रमास ग्रामपंचायत गळजे सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular