Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीकौशल्य विकासानेच महिला समृध्द होतील: संगिता वेंदे

कौशल्य विकासानेच महिला समृध्द होतील: संगिता वेंदे

मेढा: महिलांनी चुल आणि मुल या पलिकडे जावून बचतगट आणि स्वयंमरोजगारातून महिला एकत्र आल्या तरच कौशल्य विकासाने समृध्द होतील,असे मत संगीता वेंदे यांनी व्यक्त केले.
जवळवाडी (ता.जावली) येथे महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन मेळावा ग्रामपंचायतीच्या आयोजीत करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
जवळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. अनेक उद्योग-व्यवसायात महिला आघाडी घेत असून ग्रामीण भागातील महिलांनीही आता मागे न रहाता आपल्या मधे असणार्‍या कौशल्याला चालना देणे गरजेचे आहे. शेती, घर-प्रपंच सांभाळून आज अनेक महिला टेलरिंग, ब्युटीपार्लर, भाजी व्यवसाय करीत असून त्या माध्यमातुन संसाराला हातभार लावीत आहेत. नोकरदार कुटुंबातील महिलांना कामाच्या व्यस्ततेमुळे अनेक गोष्टी करता येत नाहीत अशा गोष्टींचा अभ्यास करून वेगवेगळे मसाले, सेवया, भातवड्या, सांडगे तयार करून घरपोच सेवा दिल्यास त्याच्यातून चांगला व्यवसाय उभा रहावू शकतो. या बरोबरच महिलांनी एकत्र येवून सेंद्रिय खत निर्मिती, गोधड्या तयार करणे, काही खाद्य पदार्थ बणविने असू व्यवसाय करायला हवेत.
गावागावात बचतगटाची चळवळ उभी राहिली असून त्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत असुन महिलांनी ग्रामसभेला उपस्थित रहावून जास्तीत जास्त योजनांची माहिती करून घ्यावी. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उध्दरी…या न्यायाने महिलांनी ग्रामपंचायतीच्या विकासाची दोरी हातात घ्यावी असे प्रतिपादनसंगिता वेंदे यांनी केले.
या कार्यक्रमाला सरपंच वर्षा जवळ, सदस्या शांताबाई जवळ तसेच गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular