मेढा ( अभिजीत शिंगटे ) मेढा नगरपंचायत मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त महाराष्ट्रात चालू असलेला 75 नद्यांची यात्रा अर्थात चला जाणूया नदीला हे अभियान सातारा जिल्ह्यात सुरू असून त्याचा टप्पा 1व 2 पूर्ण करण्यात आला आहे टप्पा 3 अंतर्गत अहवाल लेखनाच्या दृष्टीने माननीय अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सातारा यांचे सूचनेनुसार मेढा नगरपंचायत मेढाचे मुख्याधिकारी श्री.अमोलजी पवार साहेब व आरोग्य विभाग प्रमुख श्री. प्रमोद कुंभार यांनी पंचायत समिती जावली मेढा येथे बैठक आयोजित केली होती
सदर बैठकीस जावली तहसीलदार श्री. राजेंद्र पोळ साहेब तसेच प्रवीण पाटणकर साहेब नोडल समन्वयक कृष्णा नदी तसेच श्रीमती तरडे मॅडम सामाजिक वनीकरण विभाग मेढा तसेच सिंचन विभाग शाखा अभियंता श्री. एन. डी कदम साहेब व सिंचन विभागाचे अधिकारी , वन विभागाचे अधिकारी तसेच आरोग्य विभाग पंसजा प्रतिनिधी श्री.सावंत साहेब तसेच श्री.प्रवीण जी पवार समन्वयक वेण्णा नदी श्री.बजरंग जी चौधरी नोडल समन्वयक वेण्णा नदी तसेच जावली तालुक्यातील 48 गावचे सरपंच व ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते .
या बैठकीत नदीच्या पात्राच्या शेजारील गावनिहाय यादी लोकसंख्येसह सादर करणेबाबत सूचना करण्यात आली .गावाचा जल स्तोत्र आराखडा व स्वच्छता आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचना देण्यात आली.गावच्या नदीच्या समस्या व त्याबाबतच्या उपाययोजना काय करता येतील या बाबत मार्गदर्शन देण्यात आले .
या बैठकीचे सूत्रसंचालन श्री .बजरंग चौधरी व प्रविण पवार नोडल समन्वयक वेण्णा नदी यांनी केले तसेच सदर बैठकी करीता उपस्थितांचे सत्कार व आभार मुख्याधिकारी श्री.अमोल पवार यांनी मानले सदर बैठक पार पाडण्याकरीता नगरपंचायत अधिकारी कर्मचारी तसेच पंचायत समिती कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले .