मेढा (अभिजित शिंगटे)- माझ्या आयुष्यात मी पाय जमिनीवर ठेवले आणि आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला हे करत असताना स्वतः जवळची आत्मशक्ती जागृत केली हेच माझे यशाचे रहस्य आहे, असे उदगार सुप्रसिद्ध अभिनेते महेशजी कोठारे यांनी काढले.
सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने
2022-23 च्या ग्रंथ महोत्सवामध्ये डॅमिट आणि बरच काही या आत्मचरित्राच्या लोकार्पण सोहळ्यास आणि ग्रंथ महोत्सवामध्ये प्रदीप कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत उत्तर देताना ते बोलत होते यावेळी सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे कार्यवाह श्री शिरीष चिटणीस, उपाध्यक्ष विना लांडगे, साहेबराव होळ उपस्थित होते.
अधिक बोलताना त्यांनी सांगितले की,
मराठी चित्रपट सृष्टी मध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे मला भाग्य मिळाले, ते अनेक प्रयोग मी यशस्वी करून दाखवले कारण माझ्या आयुष्यातील माझे आई वडील , माझे गुरु आणि निखळ मैत्री करणारे मित्र आणि रसिकांनी मला दिलेले भरपूर प्रेम यामुळेे ते शक्य झाले असल्याची कबुली त्यांनी सर्वांसमोर दिली. यावेळी झालेल्या रॅपिड क्वेश्चनला महेशजी कोठारे यांनी अत्यंत नम्रपणे उत्तर दिली. महेशजी कोठारे यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लिहिलेले अनामिक पत्र प्रदीप कांबळे यांनी वाचून दाखवल्यानंतर महेश कोठारे यांना अश्रू अनावर झाले.
कार्यक्रमात सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने मानपत्र देऊन महेश कोठारे यांचा सन्मान करण्यात आला, पाली देवस्थानच्या वतीने वैभव यादव यांनी महेशजी कोठारे यांना मानाचा फेटा चढवला,मा. महेशजी कोठारे यांच्या हस्ते सुप्रसिद्ध चित्रपट पटकथा लेखक प्रताप गंगावणे, बिग बॉस फेम किरण माने, सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना माधुरी पवार, सुप्रसिद्ध अभिनेते संतोष पाटील यांचा सत्कार ग्रंथ महोत्सवात करण्यात आला.
यावेळी साताऱ्यातील चित्रकार अनंत लोहार यांनी काढलेल्या सर्व अतिथींचे पेन्सिल स्केच त्यांना सप्रेम भेट देण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य राजेंद्र शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
आत्मशक्ती जागृत करणे हेच यशाचं गुपित -: श्री महेशजी कोठारे
RELATED ARTICLES