म्हसवड: वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकीकडे प्रदूषण तर दुसरीकडे अपघात वाढत चालले आहेत.मात्र आपण अपघाताच्या नियमांचे पालन केले तर अपघात टाळता येईल असा महत्वपूर्ण सल्ला म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक मालोजीराव देशमुख यांनी दिला.
येथील विधाता सामाजिक संस्था म्हसवड व म्हसवड पोलीस स्टेशन म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहनाना रिफ्लेक्टर स्टीकर लावण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रम प्रसंगी सपोनि. देशमुख बोलत होते.
यावेळी. सातारा – पंढरपुर रोडवर सर्व वाहनाना रिप्लेक्टर रेडीयम .लावण्यात आले. या कार्यक्रमाकरीता पंचायत समिती चे मा.सभापती .पिटुदादा जगताप . माण तालुका वैद्दकियअधिकारी.डाँ.लक्ष्मण कोडलकर म्हसवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक मालोजीराव देशमुख. सहाय्यक पोलिस निरिक्षक गोसावी .पो.फौ. पायमल विधाता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन नवगण विधाता सामाजिक संस्थेचे सचिव अहमद मुल्ला परेश व्होरा आजित वेदपाठक आदि मान्यवर उपस्थित होते .याप्रसंगी बोलताना देशमुख पुढे म्हणाले सध्या शहरात तसेच ग्रामिण भागातही वाहनांची संख्या खुपच वाढली असून वाहन धारकानी वाहतुकीच्या नियमाचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होउन स्वत:चे व दुसर्याचे देखील प्राण वाचवता येइल वाहन धारकाने वाहन चालवण्यापूर्वी आपले वाहन सुस्थितीत आहे कि नाही याची खातर जमा केल्याशिवाय वाहन चालवू नये.
18वर्षाच्या आतील आपल्या मुलांच्या हातात वाहन देऊ नये वेगावर नियंत्रण ठेवावे व वहातुकिच्या नियमाचे पालन करावेअसे आवाहन मालोजीराव देशमुख यांनी केले. नगराध्यक्ष तुषार विरकर म्हणाले विधाता सामाजिक संस्था हि खरोखर समाजाच्या सेवेचेच काम करत असून या संस्थेमार्फत विविध सामाजिक कामे केली जात आहेत.
या संस्थेमार्फत प्रत्येक वर्षि रस्ता सुरक्षा अभियान राबले जाते अनेक वाहनाना स्टिकर लावून त्याना वाहतुक नियमाच्या पालनाबाबत जागरुक करण्याचे काम केले जाते वर्षभरात इतरही अनेक कामे निस्वार्थ भावनेने या संस्थेच्या माध्यमातुन केली जातात याचा आम्हाला अभिमान आहे त्याच्या या समाजोपयोगी कार्यास ज्या ज्यावेळी मदत लागेल त्यावेळी मदत करण्यास तयार असल्याचे विरकर यांनी सांगीतले जिवन अनमोल आहे. याचा विचार करुन वाहन चालवताना प्रत्येकानी काळजी घेतली पाहीजे. तसेच या संस्थे मार्फत सुरु असलेल्या कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिन नवगन व सर्व सदस्य याचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ.कोडलकर यांनी सांगीतले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रँक्टर ट्रक व छोट्या मोठ्या 200 वाहनाना रिफ्लेक्टर, स्टीकर लावण्यात आले.
यावेळी गुलाब शेख, संजय सराटे, तेजस पाठक, सुनिल लोखडे व झगडे, चौधरी, खाडे पोलिस कॉ. धुमाळ व महिला पो. कॉ. ढोले . व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वाहतूक नियम पाळा अपघात टाळा: सपोनी मालोजीराव देशमुख
RELATED ARTICLES

