म्हसवड: यात्रे जत्रेत थिरकणारी ताल धरायला लावणारी घुंगरे आज चक्क गोंदवले खुर्द मधील वॉटर कपच्या कामावर माया उंब्रजकर तमाशाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करमणूक आणि समाज प्रबोधन केले.गेले चोवीस दिवस श्रमदान करणार्या श्रमदात्यांची चांगलीच करमणूक झाली.
माण तालुक्यातील गोंदवले खुर्द मध्ये सत्यमेव जयते वॉटर कपच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात श्रमदानाची कामे सुरु असून दररोज गावातील सुमारे 1300 लोक यामध्ये सामील असतात. आज पर्यत गावात गेले चोवीस दिवस सलग श्रमदान सुरू असून दररोज नवनवीन उपक्रम सादर केले जातात अनेक सामाजिक संस्था कामासाठी सहभागी होत असून श्रमदान करत आहेत.
गोंदवले खुर्द मध्ये म्हसोबा यात्रे निमित्त मास्टर अजितकुमार भोंडवे आणि कलारजनी माया उंब्रजकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम गोंदवले खुर्द मध्ये होता ज्यावेळी ते गावात आले तेव्हा गावातील सगळे लोक श्रमदान कामासाठी गेले होते.
गावतील सर्व दुकाने आणि व्यवहार बंद असल्याचे त्यांना दिसले मग त्यांनी चौकशी केल्यावर इथं वॉटर कप साठी मोठ्या प्रमाणात श्रमदान सुरू असल्याचे समजले त्यानुसार त्यांनी आपला गावातील कार्यक्रम सादर केल्यावर आज पुढील कार्यक्रमासाठी जाताना आदी श्रमदान करायचं आणि मगच पुढ जायचं असा पवित्रा घेतला व आज गोदवले खुर्द मध्ये शिलवंत वस्ती वर काम सुरू असलेल्या ठिकाणी त्या आपल्या सर्व ताफ्या सह पोहचल्या व सुरुवातीला श्रमदान केले.
यावेळी हे लोक गेले चोवीस दिवस करत करत आलेल्या कामाचे कौतुक केले आणि आपण सुध्दा आपल्या कलेच्या माध्यमातून या काळ्या आईची सेवा करणार्या श्रमदात्यांचं मनोरंजन करण्याचा निर्णय घेतला.दररोज मंडप, स्टेज ,लाईटचे विविध प्रकार, साऊंड सिस्टीम,याच्या समोर कार्यक्रम सादर केला जातो आज मात्र या सगळ्या सिस्टिम व्यतिरिक्त त्यांनी श्रमदान करणार्या लोकांच्या समोर गण गवळीने या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि पाणी वाचवा पाणी आडवा हा संदेश देत समाजप्रबोदन पर गीतांची चांगलीच मैफिल झाली.
पाणी हे जीवन आहे त्याला जपलं पाहिले.माळ्याची मळ्यामंदी पाटाचे पाणी वाही अशी गीते सादर करण्यात आली.यावेळी महिला युवती जेष्ठ नागरिक असे सर्वजण उपस्थित होते त्यांनी कार्यक्रमाचा चांगलाच आनंद लुटला व कामाचा थोडा शिनवटा ही घालवला.
आम्ही ज्या गावात कार्यक्रम करायाला जातो त्या दिवशी तेवढ्या पुरते तिथले रहिवाशी होतो मग त्या गावाच्या चाली रीती प्रमाणे आम्ही राहत असतो म्हणूनच आज गोंदवले खुर्द जे चांगल काम सुरू आहे त्यामध्ये आम्ही श्रमदान करायचा निर्णय घेतला.गोंदवले नक्की पाणीदार होणार.
माया उंब्रजकर तमाशा मालकीण
यात्रे जत्रेत थिरकणारी घुंगरे चक्क गोंदवले खुर्द मधील वॉटर कपच्या कामावर
RELATED ARTICLES