म्हसवड : लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर म्हसवड ठाण्याचे कर्मचारी मौजे पळसावडे ता.माण येथे रात्रगस्त करत असताना पांडूरंग भागवत धुळगुडे वय 22 या युवकास बेकायदेशीर तलवार बाळगल्या प्रकरणी त्याच्यावर म्हसवड पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्सटेबल अभिजीत भादुले यांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.14 रोजी म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि मालोजीराव देशमुख सहाय्यक फौजदार पायमल पोलिस कॉन्सटेबल एस.पी.बागल, धुमाळ, शिंदे व गाडी चालक पळसावडे येथे रात्रगस्त पेट्रोलिंग करत होते.
या गावच्या बसथांबा परिसरात एक युवक संशयीतरित्या चालत चालला असताना पोलिसांना दिसला असता त्याचा संशय आल्याने त्याची चौकशी केली. तो चाचपडू लागला, त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या शर्टाच्या पाटीमागे मॅन मध्ये लपवलेली धारधार तलवार सापडली.
त्याची अधिक चौकशी केली असता त्याने पांडूरंग भागवत धुळगुडे वय 22असे सांगून सन 2016मध्ये गावातील जितेंद्र चव्हाण याचेशी माझ्या आत्याचा मुलगा अनिल शेळके याचे मातीचा गाळ उचलण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. त्यावेळी संशयीतास म्हसवड पोलिस ठाण्यात अटक झाली होती असे सांगितले. तो मला मारेल या भितीपोटी जवळ तलवार बाळगली असल्याचे सांगितले.
बेकायदेशीर विनापरवाना धारधार शस्र बाळगल्याच्या कारणावरून पोलिस कॉन्सटेबल अभिजीत भादुले यांनी संशयीत आरोपी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सपोनि मालोजीराव देशमुख करत आहेत.
बेकायदेशीर तलवार बाळगल्याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात युवकावर गुन्हा दाखल
RELATED ARTICLES