Sunday, December 14, 2025
Homeठळक घडामोडीआश्रमशाळा वसतीगृहाची पायाभरणी; सनराईज प्रतिष्ठानचा उपक्रम ठरतोय नवा आदर्श

आश्रमशाळा वसतीगृहाची पायाभरणी; सनराईज प्रतिष्ठानचा उपक्रम ठरतोय नवा आदर्श

म्हसवड: सातारा जिल्ह्यात माणदेशाच्या प्रदेशावर पाण्याविना येथील जनतेची परवड सुरु असल्याचे निदर्शनास पडते. माण भूमिवर दुष्काळाचा प्रभाव असला तरी, याच माणदेशाच्या मातीत मायेचा ओलावा मात्र काही कमी नाही हे सिद्ध केलय पानवण गावच्या रमाताई तोरणे या मानदेशी माय माऊलीने. सन-2000 पासून अखंडपणे रमाताई अनाथ मुला-मुलींसाठी आश्रमशाळा चालवून मायेची उब देण्याचे काम करत आहेत. सध्या आश्रम शाळेत 60 मुलांचा संभाळ होत आहे. शासनाच्या कोणत्याही मदतीविना हे सर्व कार्य रमाताईनी मोठ्या जिद्दिने चालू ठेवले आहे. तोरणे दांपत्याने निवृत्तीनंतर मिळालेला सर्व पैसा आश्रमासाठी खर्च केलाय. सध्या त्यांना आर्थिक विंवचनेला सामोरे जावे लागत आहे. आश्रमाच्या संस्थापिका रमाताई तोरणे व मुलगा उमाकांत तोरणे यांनी अनाथ आश्रमसाठीचे घेतलेले कष्ट व त्यांनी दिलेली सेवा, आश्रमात मुलांचे होणारे पालन पोषण पाहून पुण्यात नोकरी करणारे आयटियन्सनी आश्रमाला मदतीचा हात देऊ केलाय.
आयटियन्सनीची ओळख
पुणे शहरातल्या हिंजवड़ी भागात काम करणार्‍या आयटियन्सना म विक एंडफ ला भटकती करत असताना मानदेशातल्या पानवण गावातील अनाथ आश्रमाची माहिती मिळाली. गिर्यारोहनाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या तरुण आयटियन्सनी सनराईज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आश्रमशाळेला सोलर देणे, मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह उभरन्याचे ठरवले. त्यासाठी या आयटियन्सनी गत एक वर्षापासून पुणे, पिपरी चिंचवड शहरात गणेश मंडळासमोर शिक्षणाची जनजागृती करताना तळागाळातील मुलांची शिक्षणासाठी होणारी फरफट स्कुल चले हम या नाटिकेतून मांडली. त्यातून या आश्रमशाळेला मदत करण्याचे आवाहन केले. नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत झाले. दोन दिवसांपूर्वी संत गजानन महाराज आश्रम, पानवण येथे मसोलर वाटर हीटर चे उद्घाटन कार्यक्रम पार पडला.
500 लिटर क्षमता असलेला हा प्रकल्प रोटरी क्लब चिंचवड या संस्थेने आश्रमास उपलब्ध करून दिलाय. यासाठी रोटरीच्या अध्यक्षा अनघा रत्नपारखी यांनी मोलाचे सहकार्य लाभले. सनराईज प्रतिष्ठान, पुणे यांच्या मेहनतीतून होत असलेल्या सुमारे 650 चौरस फुट वसतीगृहाचे भूमीपूजनाचा कार्यक्रमही या निमित्ताने पार पडला.
पथनाट्यातून उभरला निधी
सनराईज प्रतिष्ठानने गेल्या एक वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्य सादर करून तसेच विविध उपक्रम राबवून वसतीगृह बांधण्यासाठी निधी उभारला. वसतीगृह बांधकामाला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत असल्याने मदत निधी उभारण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व आयटियन्सनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे या वसतीगृहाचे बांधकाम सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय असणारे लोकप्रिय शासकीय कंत्राटदार जवाहर काळेल साहेब यांना देण्यात आले आहे. सदर वसतीगृहाचे काम पुढील तीन महिन्यांत पुर्ण करण्याचा आशावाद जवाहर काळेल यांनी व्यक्त केला आहे. तसेच श्री. काळेल वसतिगृहाच्या रंगरंगोटीचे काम स्वतः करुन देणार आहेत.
पानवणच्या अनाथ आश्रमाच्या मदतिसाठी आयटियन्सचा समूह असलेला सनराईज प्रतिष्ठान सर्व प्रथम पुढे सरसावला. त्यांनी पुण्याहून थेट माणदेशात अश्रमस्थळी येऊन पाहणी केली. प्रत्यक्ष कामाला सुरवात करुन एक पाऊल पुढे टाकल्याने संगणक अभियंत्याचे संपूर्ण माणदेशात कौतुक होत आहे.
छायाचित्रात सोलर उद्धघाटन व वसतीगृह भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र असताना श्री. गजानन महाराज आश्रमाच्या संस्थापिका रमाबाई तोरणे, अधिक्षक उमाकांत तोरणे, सनराईज प्रतिष्ठानचे अतुल पारखे, स्वप्निल जोशी, सोमनाथ रसाळ, सुमित पवार व इंजि.जवाहर काळेल साहेब उपस्थित होते. खरे पाहता पुण्यातील काही संगणक अभियंत्यानी एकत्र येवून सनराईज प्रतिष्ठानच्या मध्यमातुन अनाथ मुला मुलीसाठी वसतीगृह उभरन्यासाठी सुरु केलेला उपक्रम समाजात नवा आदर्श ठरत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular