Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडी‘वनराई सामाजिक संस्थेने निर्माण केला सामाजिकतेचा आदर्श ’

‘वनराई सामाजिक संस्थेने निर्माण केला सामाजिकतेचा आदर्श ’

म्हसवड : वनराई सामाजिक संस्थेने म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कुल मध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून शाळेचा चेहरा मोहरा बदलत सामाजिकतेचा आदर्श निर्माण केला.
वनराई संस्थेचा 33 वा वर्धापन दिन वनराई परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला. म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज मधेही हा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा केला. यावेळी प्रशालेचे प्राचार्य ए.बी.शिंदे बोलत होते. यावेळी पर्यवेक्षक टी.एस.गावडे, जेष्ठ शिक्षक डी.बी.माने आदी उपस्थित होते.
यावेळी ए.बी. शिंदे म्हणाले, देसाई ब्रदर्स, पुणे यांच्या आर्थिक मदतीतून वनराई या संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया, प्रकल्प अधिकारी जयवंत देशमुख यांच्या सहकार्याने आमच्या विद्यालयात विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी यांच्यासाठी विद्यालयात अत्यंत महत्वाची असणारी भौतिक सुविधा म्हणजे स्वच्छतागृह, ही सुविधा करून देण्यात आली आहे. अत्यंत अद्ययावत अशी ही सुविधा करण्यात आली आहे. तसेच चँजिंग रूमची ही सोय या ठिकाणी करण्यात आली आहे.
याशिवाय एकविसाव्या शतकाची अत्यंत महत्वाची शालेय गरज म्हणजे संगणक प्रयोगशाळा, विद्यालयात अत्यंत अद्ययावत अशी वातानुकूलित संगणक प्रयोगशाळा विद्यालयात केली आहे. यामध्ये ई लर्निंग सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मैदान सुशोभीकरणांतर्गत मैदानावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत.प्रयोग शाळेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजीही देसाई ब्रदर्स व वनराई यांच्या कडून घेण्यात येते. या अंतर्गत विद्यालयातील सर्व विद्यार्थ्याची नेत्र तापासानी करून आवश्यक असणारणा चष्मे वाटप करण्यात आले आहेत. दुसरा आरोग्याचा प्रश्न हाती घेत विद्यालयातील विद्यार्थ्याना शुद्ध पाणी मिळावे यासाठी लवकरच पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
सिद्धनाथ हायस्कुल येथे वनराई या संस्थेचा वर्धापनदिन वणाराईचा परिवार म्हणून साजरा करण्यात आला.विद्यालयातील विध्यार्थ्याणी शहरातून वृक्ष दिंडी काढण्यात आली. त्यानंतर विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular