Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीपिंपरीच्या कुस्ती मैदानात पै.अतुल पाटीलला गुणावर विजयी घोषित

पिंपरीच्या कुस्ती मैदानात पै.अतुल पाटीलला गुणावर विजयी घोषित

म्हसवड : माण तालुक्यातील पिंपरी येथील हनुमान यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी पूण्याच्या पै.अतुल पाटील विरुद्ध खवसपूरच्या पै.समाधान पाटील यांच्यात लढत झाली.
एक तास वीस मिनिटे चाललेली ही कुस्ती अखेर गुणावर खेळण्याचा पंच व ग्रामस्थांनी घेतला. खवसपूरच्या पै.समाधान पाटील गुणावर खेळण्यास नकार दिल्याने पुण्याच्या पै. अतुल पाटीलला विजयी घोषित करण्यात आले त्याला प्रथम क्रमांकाचे एक लाखाचे बक्षीस देण्यात आले.
दुसर्‍या क्रमांकाच्या कुस्ती स्थानिक पै. गणेश कुंकुले व पै.माऊली कोकाटे यांची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली यांची कुस्ती बराच वेळ चालली पण दोन्ही पैलवानाची ताकद समान पडत असल्याने प्रत्येक वेळी डाव प्रतिडाव करत दोघांचाही बचाव होत होता.
तिसर्‍या क्रमांकाच्या कुस्तीत स्थानिक पै. निलेश तरंगे विरुद्ध पुण्याचा पै.रवी करे यांच्यात लढत झाली ही कुस्ती पण बरोबरीत सोडवण्यात आली .50 हजार रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले. चौथ्या क्रमांकाच्या कुस्ती सातारच्या पै.विकास सुळ विरुद्ध म्हसवडच्या पै. तानाजी विरकर यांच्यात झाली ही पण कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली आहे . 50 हजार रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले.
पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत स्थानिक पै. विशाल राजगेने औधच्या पै. गजानन बोडकेवर दुहेरी पटावर मात केली. त्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत स्थानिक पै. निलेश राजगे वर म्हसवडच्या पै. कृष्णा नागवे याने मात केली. त्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
सातव्या क्रमांकाची कुस्ती स्थानिक पै. किरण राजगे विरुद्ध कारीचा पै. प्रशांत कदम यांची बरोबरीत सोडवली.त्यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले. प्रारंभी पन्नास रुपयांपासून कुस्तीस प्रारंभ झाला. या कुस्ती मैदानात अनेक कुस्त्या चटकदार झाल्याने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी उपसभापती पै.नितीन राजगे, अर्जुन तरंगे, विकास राजगे, भिमा राजगे, तानाजी राजगे, दादा कुंकुले, शंकर अवघडे, विजय कुर्ले, भगवान बुधावले, नाना राजगे, भिकू राजगे, बाळू शिंदे, डॉ.दिलीप राजगे, सोमाजी राजगे, आबासाहेब राजगे, आनंदा राजगे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
पंच म्हणून माजी सभापती पै.संदीप मांडवे, पै.आण्णा वस्ताद, वस्ताद पोपट रुपनवर, वस्ताद महालिंग खांडेकर, पै. बाळासाहेब काळे, पै. हणमंत गायकवाड, पै.सत्यवान दिडवाघ, पै. नवनाथ खांडेकर, संजय दिडवाघ, सुखदेव दिडवाघ, शशिकांत गायकवाड, सुभाष काटकर, सुरेश राजगे, यांनी काम पाहिले. यावेळी पै.अनिकेत कदम यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular