म्हसवड: माण तालुक्यातील भाटकी येथील श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी शंभो महादेवाच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात चटकदार कुस्त्या झाल्या. परंतु प्रथम व द्वितीय क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. या मैदानात अनेक नामवंत मल्लांनी हजेरी लावून कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
प्रारंभी पन्नास रुपयांपासून कुस्तीस प्रारंभ झाला. प्रथम क्रमांकाची कुस्ती म्हसवडचा मल्ल नाना खांडेकर विरुद्ध पिंपरीचा मल्ल गणेश कुंकुले यांच्यात झाली. ही कुस्ती बरोबरीत सुटली. प्रथम क्रमांकांचे इनाम एक्कावन हजार रुपये विभागून देण्यात आले. द्वितीय क्रमांकाची कुस्ती देवापूरचा मल्ल गणेश जाधव विरुद्ध कुंडल तालमीचा मल्ल बाळू भेडवाल यांच्यात झाली. ही कुस्तीही बरोबरीत सोडवण्यात आली. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पंचवीस हजार रुपयांचे विभागून देण्यात आले.
तृतीय क्रमांकाची कुस्ती पै.विशाल राजगे विरुद्ध पै.गोविंद दिडवाघ यांच्यात वीस हजारांची कुस्ती झाली. यात विशाल राजगे याने गोविंद दिडवाघला चितपट केले. चौथ्या क्रमांकांची कुस्ती गौरव हजारे विरुद्ध निलेश राजगे यांच्यात पंधरा हजार रुपये बक्षीसाची झाली ही कूस्ती बरोबरीत सुटली. पाचव्या क्रंमाकाची कुस्ती प्रसाद पुकळे यांनी घुटना डावावर विनायक चंदणेवर मात केली.
त्याचबरोबर या कुस्ती मैदानात नामवंत कुस्तीपटूनीं मैदान गाजवले. महिला कुस्ती पटुनीं कुस्त्यांची दंगल घडवून भाटकीकरांना आकर्षक कुस्त्यांचे दर्शन घडवले. या कुस्ती मैदानात ऋतूजा पवार, अस्मिता लोंखडे, ममताच मूलाणी, रोहिणी राजगे, अनुराधा गंलडे, शुभांगी व्होनमाने, दिव्या पोळ, या महिला कुस्ती पटुनीं सहभाग नोंदवला.
हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय शिर्के, अंकुश शिर्के, नामदेव शिर्के (सचिव), नवनाथ शिर्के, अंकुश शिर्के(पेंटर), पोपट शिर्के, नामदेव शिर्के, राहूल रकटे, राहुल देवकर, पै.लक्ष्मण अहिवळे, मंच्छिद्र शिर्के, लक्ष्मण शिर्के, रावसाहेब शिर्के, विकास शिर्के, शहाजी रकटे यांनी परिश्रम घेतले. पंच म्हणून बापू चव्हाण, सचिन शिर्के, महालिंग खांडेकर, पोपट रूपनवर, धनाजी कोडलकर, नारायण बाड, शिवाजी दिडवाघ, विलास रुपनवर, दादा राजगे, शशिकांत गायकवाड, किरण पोळ, नाना जाधव, ज्ञानदेव गायकवाड, सत्यवान दिडवाघ, संभाजी मासाळ, शत्रुघ्न नरळे यांनी पाहिले. सर्व कुस्त्यांचे समालोचन परशुराम पवार यांनी केले.
भाटकी येथील कुस्ती मैदानात चटकदार कुस्त्या
RELATED ARTICLES