म्हसवड: पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात ओढविलेल्या पूरग्रस्त परिस्थितीला सहकार्य म्हणून क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड यांचेतर्फे 10 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये नुकतीच जमा करण्यात आली.
राज्याचे शालेय व शिक्षण मंत्री ना.आशिष शेलार यांचेकडे क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रा.विश्वंभर बाबर यांनी दहा हजार रुपयांचा धनादेश मुंबई येथे दिला. यावेळी संस्था सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुनील मगर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राची साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील सिद्धनाथ बालक मंदिर, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्राथमिक शाळा, नूतन मराठी प्राथमिक शाळा, आत्मगिरी माध्यमिक विद्यालय, क्रांतिवीर ज्यु कॉलेज, क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कुल आदी मधील विद्यार्थ्यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी आपला खारीचा वाटा उचलून सहकार्याची भूमिका घेतली. क्रांतिवीर संकुल नेहमीच उपक्रमशील व सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने अनेकांनी याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
क्रांतिवीरच्या चिमुकल्यांकडून पुरग्रस्तांसाठी 10 हजार रूपयांची मदत
RELATED ARTICLES