Thursday, June 19, 2025
Homeक्रीडापै. भारत मदने यांनी मारले देवापूरचे कुस्ती मैदान

पै. भारत मदने यांनी मारले देवापूरचे कुस्ती मैदान

म्हसवड : माण तालुक्यातील देवापूर येथे श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी श्री शंभू महादेव यात्रेनिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानात पै.भारत मदने व पै. समाधान पाटील यांच्यात जोरदार कुस्तीची रंगत पाहायला मिळाली. दोघांनी एकमेकांचा अंदाज घेत डाव – प्रतिडाव करत सावध पवित्रा घेतला . मात्र पै. भारत मदने याने एकेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न पै. समाधान पाटील यांनी धुडकावून लावला . तद्नंतर पै.समाधान पाटील यांनी पोकळ घिस्सा डावावर चितपट करण्याचा प्रयत्न केला पण पै. भारत मदने यांनी आतून अंगावर येवून पै.समाधान पाटील यांना असमान दाखवून एक लाख रुपयांचे इनाम आपल्या नावावर केले.
दुसर्‍या क्रमांकाच्या कुस्ती सातारच्या पै. विकास सूळ विरुद्ध कुर्डुवाडीच्या पै. महारुद्र काळेल यांची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली . 75 हजार रूपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले. तिसर्‍या क्रमांकाच्या कुस्तीत पुण्याच्या पै. जयदीप गायकवाड याने आटपाडीच्या पै. तानाजी विरकर वर मात केली त्यास 75 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत स्थानिक पै. गणेश जाधव याने चटकदार कुस्ती करत निमगाव केतकीच्या पै.दादा जाधव वर मात केली आहे . त्यास 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत पिंपरीच्या पै. गणेश कुंकुले विरुद्ध कुर्डुवाडीच्या पै. सागर मोटे यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली . त्यांना 41 हजार रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले आहे. सहाव्या क्रमांकाच्या कुस्ती स्थानिक पै. महादेव माने व खडूसचा पै. आशिष वावरे यांचीही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. त्यांना 31 हजार रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत स्थानिक पै. तुकाराम बुधावले याने आटपाडीच्या पै.योगेश कदम यांच्या वर मात केली. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत खवसपूरच्या पै.विक्रम भोसले याने आटपाडीच्या बाबू तांबवे वर मात केली. याशिवाय या कुस्ती मैदानात अनेक कुस्त्या चटकदार झाल्याने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले. हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
पंच म्हणून वस्ताद रावसाहेब मगर, वस्ताद भारत भोसले, वस्ताद तानाजी बोडरे, वस्ताद पोपट रुपनवर, वस्ताद महालिंग खांडेकर, वस्ताद रावसाहेब कोळपे, पै. सत्यावान दिडवाघ, पै.नवनाथ खांडेकर, आंनदा बाबर, पै. किरण पोळ, विलास रूपनवर, नारायण बाड, शशिकांत गायकवाड, गणेश गायकवाड, विशाल जाधव, नाना जाधव, दिलीप विरकर, सुभाष काटकर, सुखदेव दिडवाघ, किरण शेंडगे यांनी काम पाहिले .यावेळी परशुराम पवार यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular