म्हसवड: वरकुटे ता. माण येथे शिवजयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. येथील युवाराजे ग्रुपच्या वतीने किल्ले रायगड येथून शिवज्योत आणण्यात आली तत्पूर्वी शिवाजी चकात शिवछत्रपतींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.सायंकाळी गावातून शिवज्योत व शिवप्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मा.कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतना सांगीतले की रायगडाचा विकास करण्यात माझा हातभार लागला हे काम माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे काम होते.तरूणनी आपल्यामध्ये योग्य ते बदल करुन छत्रपतींनी दाखवून दिलेल्या स्वाभिमानी वाटेवरुन चालण्याचा प्रयत्न करावा.
या कार्यक्रमात शिवव्याख्याते पवार यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही वेचक प्रसंग सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.पं.स सभापती श्रीराम पाटील यांनीही शिवाजी महाराज यांचे विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अनेक लहान मुलांनीही आपले मनोगत व्यक्त केली.
यावेळी नुकतेच सुभेदारपदी बढती मिळालेले आण्णासाहेब माने यांचा सत्कार सम्मानचिन्ह,शॉल,श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आजी माजी सनिकांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात रा स प चे राज्य कार्यकारणी सदस्य बबनदादा विरकर, युवा नेते मनोजदादा पोळ अँड.पृथ्विराज राजेमाने, सामाजिक कार्यकर्ते सोपानराव पोळ, ग्राम पंचायतीचे उपसरपंच मारुती मोटे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष माने, हणमंतराव माने, काका माने,पोलिस पाटील अंकुश माने, साहित्यिक अजित काटकर, ग्रामविकास अधिकारी विजय काटकर,विजय शिंदे,बाळासाहेब जाधव, आकाश माने,डॉ.सावंत,अमित माने, यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन शिंदे, शुभम मोहिते., महादेव माने, धर्मेंद्र शिंदे, सचिन माने, हर्षराज माने, निलेश माने, अनिकेत खुळे, संतोष सावंत,आकाश माने, बंडू माने, अविनाश माने, अविनाश गायकवाड, विशाल माने,सागर माने,प्रशांत माने, सुशांत माने इत्यादिंनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल माने यांनी केले.
वरकुटे येथे शिवजयंती उत्साहाने साजरी
RELATED ARTICLES