म्हसवड : शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मुले अधिक काटक असतात या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास खेळामध्ये अधिक चमकतील. गरज आहे ती फक्त योग्य मार्गदर्शनाची, असे विचार श्रीमंत पृथ्वीराज राजेमान यांनी व्यक्त केले.
माण तालुका स्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कूल येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे ग.कौ.चे सदस्य व शाळा समितीचे व्हा.चेअरमन श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी म्हसवड पोलीस ठाण्याचे स.पो.नि.गणेश वाघमोडे, शाळा समितीचे सदस्य नितीन दोशी, विपुल दोशी, संभाजी माने, माण तालुका क्रीडा अध्यक्ष महेश बडवे, यु.व्ही जाधव, पै.महालिंग खांडेकर, डॉ.पिंजारी, विश्वजित राजेमाने प्रशालेचे प्राचार्य एम जी.नाळे, उपप्राचार्य अशोक शिंदे, क्रीडा शिक्षक यु.बी.पोळ, मारुती लोखंडे, महेश सोनवले आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. राजेमाने म्हणाले, अशा प्रकारच्या विविध खेळांच्या स्पर्धाना सिद्धनाथ हायस्कूलने सहकार्य केलेले आहे आणी यापुढेही असेच सहकार्य राहिल.
यावेळी शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यानी खेळासही प्राधान्य द्यावे कारण खेळामुळे शरीर निरोगी राहते आणि मन प्रसन्न राहण्यास मदत होते, असे विचार स.पो.नि. गणेश वाघमोडे यांनी व्यक्त केले. यावेळी नितीन दोशी म्हणाले, अलिकडच्या काळात मुले मैदानावर कमी आणि शाळा, क्लासमध्ये जास्त जास्त व्यस्त दिसतात. यातून थोडासा वेळ मिळाला तर त्यांच्या हातात मोबाईल दिसतो आहे. या सर्वांमध्ये मुले मैदानावरील खेळच विसरले आहेत. याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांनीही मुले दिवसांमध्ये थोडावेळतरी मैदानावर खेळातील याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एम जी नाळे यांनी तर आभार उपप्राचार्य ए बी शिंदे यांनी मानले.
‘योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण मुले खेळामध्ये चमकतील’
RELATED ARTICLES