म्हसवड : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली झाली. त्यामुळे आज मुली सर्वच क्षेत्रात भरारी घेत आहेत. त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन, गती देण्याचे काम वरकुटे-मलवडीचे सामाजिक कार्यकर्ते धिरज जगताप करत असल्याचे मत आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे सदस्य खंडेराव जगताप यांनी व्यक्त केले.
वरकुटे – मलवडी येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल मधील होतकरू व गरजु विद्यार्थिनींना धिरज जगताप यांनी आर्थिक मदत केली आहे. पाच विद्यार्थिनींच्या खात्यावर पाच हजार रुपयांची ठेव पावतीचे वाटप करताना त्यावेळी ते बोलत होते.
जगताप पुढे बोलताना म्हणाले, धिरज जगताप यांचा हा उपक्रम गरिब व सामान्य कुटुंबातील मुलीच्या शिक्षणासाठी आधारवड ठरणार आहे. बनगरवाडीचे माजी सरपंच भारत अनुसे म्हणाले भागातील वाड्यावस्त्यांवरील गोरगरीब मुलींमध्ये गुणवत्ता आहे. मात्र त्या आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मनाने खचतात. अशा विद्यार्थिनींंसाठी आर्थिक मदत करण्याचा धिरज जगताप हा उपक्रम अनुकरणीय आहे.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक यांनी शाळेच्या शैक्षणिक कामांचा आढावा सांगितला. तसेच ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी धिरज जगताप यांनी हा उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर धिरज जगताप यांनी वरकुटे – मलवडीसह परिसरात प्रत्येक सामाजिक कार्यात नेहमीच आर्थिक मदत केली आहे.
यामध्ये शहिद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत असो, जलसंधारणाच्या कामासाठी आर्थिक मदत नेहमीच करतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोकवर्गणीतून शाळा बांधण्यासाठी आर्थिक मदत, गावातील खेळाडूनां क्रीडा साहित्यासाठी मदत, हरिनाम सप्ताह, यात्रा, क्रिडा स्पर्धा अशा अनेक सामाजिक कार्यात मदत करतात.
यावेळी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख युनुस इनामदार, सेवानिवृत्त पोलिस हवालदार राणा आटपाडकर, माजी सरपंच प्रल्हाद अनुसे, तानाजी बनगर (शेठ), दादासाहेब काळेल, बापूसाहेब मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. संजय जगताप यांनी सुत्रसंचालन केले तर वर्षा कदम यांनी आभार मानले.
यशवंतराव चव्हाण हायस्कूलमधील होतकरू व गरजू विद्यार्थिनींना आर्थिक मदत
RELATED ARTICLES