Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीदुथडी भरून वाहणार्‍या माणगंगेचे खणा-नारळाने ओटी भरून पूजन

दुथडी भरून वाहणार्‍या माणगंगेचे खणा-नारळाने ओटी भरून पूजन

म्हसवड: माणगंगा नदीला आलेल्या पुराचे दहिवडीच्या माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे यांच्या हस्ते खणा- नारळाने ओटी भरून विधिवत पूजन करण्यात आले.
माण तालुक्यात या वर्षी परतीच्या पावसाने जोराची हजेरी लावली आहे. सर्वत्र चांगला पाऊस सुरू असून माण तालुक्यात असणारे आंधळी धरण 2009 ला झालेल्या पावसाने भरून वाहिले होते त्यानंतर यावर्षी भरून वाहू लागल्याने दहिवडी येथे माणगंगा दुथडी भरून वाहू लागली आहे. दहिवाडीच्या माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे यांच्या हस्ते खणा- नारळाने ओटी भरून विधिवत पूजन करण्यात आले.
माण तालुक्यात यावर्षी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून तालुक्यातील सर्व पाझर तलाव, बंधारे भरून वाहू लागले आहेत. तसेच पाणी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या कामांमुळे जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास चांगलीच मदत झाली आहे. अनेक वर्षांनंतर दहिवडी येथे माणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बच्चे कंपनीने नदीच्या पाण्यात खेळन्याचा आनंद घेतला.
काल रात्री आंधळी धरणाच्या क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे जवळ जवळ भरत आलेले आंधळी धारण भरून वाहू लागले. पाण्याचा विसर्ग जास्त असल्यामुळे माणगंगा नदीच्या काठावर असणार्‍या हिवडी, गोंदवले, पळशी तसेच म्हसवड या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला.म्हसवड नगरपालिकेची प्रशासन यंत्रणा सकाळपासून लोकांना सावधानतेचा इशारा देत होती. तसेच नगरसेवक युवराज सूर्यवंशी, अभियंता चैतन्य देशमाने नदीकाठी स्वता थांबून लोकांना परिस्थितीची कल्पना देत होते. शिवाय नगरपालिकेच्यावतीने रिक्षांमधून परिस्थितीची कल्पना लोकांना देत होते.
आंधळी धरणातून बाहेर पडणारे पाणी दुपारच्या दरम्यान म्हसवड पर्यंत पोहचले व त्यामुळे माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली. माणगंगा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular