Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडी‘सिध्दनाथाच्या नावानं चांगभल’ च्या जयघोषात म्हसवड नागरी गुळालात न्हाऊन निघाली

‘सिध्दनाथाच्या नावानं चांगभल’ च्या जयघोषात म्हसवड नागरी गुळालात न्हाऊन निघाली

लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी रथोत्सव उत्साहात
म्हसवड (विजय भागवत): सिध्दनाथाच्या नावानं चांगभल च्या जयघोषात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल खोबर्‍याची उधळण करीत रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. संपूर्ण म्हसवड नागरी गुळालात न्हाऊन निघाली होती
अखिल महाराष्ट्र तसेच आंध्र, कर्नाटक या राज्यातील अनेक भाविकांचे श्रध्दास्थान व दैवत असणार्‍या म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्ती सालकरी यांच्या घरुन वाजतगाजत रथामध्ये बसवण्यात आल्या. रथामध्ये उत्सवमूर्ती बसवल्यानंतर श्रींच्या मूर्तींच्या रथातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा असून अजितराव राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजी राजेमाने, विजयसिंह राजेमाने, गणपतराव राजेमाने, शिवराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, दिपसिंह राजेमाने, शहाजीराजे राजेमाने, विश्वजित राजेमाने तसेच बाळासाहेब माने, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, पोलीस उपविभागीय अधिकारी बी बी महामुनी, तहसीलदार बाई माने, मुख्याधिकारी चेतना केरुरे, सपोनि गणेश वाघमोडे यांच्या उपस्थित रथोत्सवास प्रारंभ झाला.
श्रींचा विवाह सोहळा एक महिनाभर चालतो. दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापनेचे व हळदी समारंभाने या विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला.त्यानंतर तुळशीविवाह, श्री सिध्दनाथांचा व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होवून आज बुधवार रोजी लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव संपन्न झाला.
रथ नगरप्रदक्षिणेस सुरुवात झाल्यानंतर यावेळी बायपास रस्त्याने सुरुवात झाली. भाविकांनी सिद्धनाथाच्या नावाने चांगभलं च्या गजरात रथावर गुलाल व खोबर्‍याची उधळण केली. तसेच अनेक भक्तांनी निशाने, नारळाची तोरणे, पैशांच्या नोटांची तोरणे श्रींना अर्पण केली. अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली होती. रथ नगरप्रदक्षिणेसाठी निघाल्यानंतर उजवी प्रदक्षिणा घालून रथ बायपास रस्त्याने नवीन नगरपालिका ,महात्मा फुले चौक व तसेच पुढे बसस्थानक चोकातून सातारा – पंढरपूर रस्त्यावर ओढत आणला. तेथून पुढे श्री सिध्दनाथ यांच्या बहिणीस मानकर्‍यांच्या हस्ते साडी-चोळी यांचा आहेर करण्यात आला. याच ठिकाणी नवसाची मुले रथावरुन खाली टाकण्यात आली व नवस फेडण्यात आले. त्यानंतर रथ वाघजाई ओढ्यातून पुढे कन्या विद्यालय श्री लक्ष्मीआई मरीआई मंदिर मार्गावरुन रथाने नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.
भाविकांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळातर्फे कराड, वडूज, अकलूज, विटा, सातारा, मेढा, सोलापूर, पंढरपूर, आटपाडी आदी आगारांनी जादा बसेस सोडल्या होत्या.म्हसवड पोलिस स्ठेशनच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये पोलिस उपअधीक्षक बी बी महामुनी यांच्यासह सात पोलिस अधिकारी, 140 पोलिस कर्मचारी, 35 महिला अधिकारी,सपोनि गणेश वाघमोडे व आपत्कालीन पथक यांचा समावेश होता आरोग्य विभागाच्या वतीने तीन वैद्यकीय पथके व एक फिरते पथक करण्यात आले होते.
म्हसवड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तुषार वीरकर, उपनागराध्यक्षा सौ. स्नेहल युवराज सूर्यवंशी, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापती सौ. हिंदमालादेवी राजेमाने,शिक्षण सभापती दीपक बनगर , नियोजन समिती सभापती गणेश रसाळ, गटनेते धनाजी माने, नगरसेवक केशव कारंडे,आशा कारंडे, नगरसेवक दीपक बनगर, मनीषा विरकार, साळूबाई कोळेकर,, डॉ. वसंत मासाळ, गणेश रसाळ, माजी नगराध्यक्ष विलासराव माने,विजय सिन्हा,नितीन दोशी,दहिवडीच्या नगराध्यक्षा सौ.साधना गुंडगे,आप्पा पुकळे,सर्जेराव माने,बबनदादा वीरकर, पंचायत सामीती सदस्य सौ. लतिका बबनदादा वीरकर डॉ लक्ष्मण कोडलकर, वाहतूक पोलीस संतोष बागल,,दत्तोपंत भागवत,,प्रा. विश्वंभर बाबर, सरपंच काका माने,अंकुश अब्दागिरे, योगेश जंगम,सौ वैशाली जंगम,शैलेश जंगम,सौ साक्षी जंगम,सुनील भागवत, चारुदत्त रसाळ,प्रशांत तारळेकर,वल्लभ तारळेकर,बाळराजे वीरकर,डॉ विलास सावंत,राजेंद्र माने,इंजि चैतन्य देशमाने,माजी नगराध्यक्ष रवी वीरकर,आकाशबाबा माने,दिलीप आप्पासाहेब माने,दत्तात्रय भीमराव माने,अमोल वसंत म्हेत्रे,किरण शिवदास कालढोणे, राहुल मंगरुळे, डॉ वसंत मासाळ,बाळासाहेब पाणसांडे,डॉ विकास बाबर,डॉ मनीषा बाबर,राजेंद्र पिसे,विपुल दोषी,नितीन महामुनी,इंजि संतोष भोसले, सिध्दनाथ देवस्थान ट्रस्टचे चेअरमन अजित गुरव सचिव दिलिपराज किर्तेने, दिनेश शिंदे,सुरेशशेठ बाबर, आकाशबाबा माने,पोपट बनसोडे,मोनाली बनसोडे पाटील, संग्राम पाटील, विजय भागवत, धनाजीपिसे,सागर सरतापे,चैतन्य देशमाने, अजितकुमार काटकर अंकूश अबदागिरे, अजितकुमार काटकर, अहमद मुल्ला, सागर बाबर, धनंजय पानसांडे, शिवशंकर डमकले, राजू केवटे, सिध्दार्थ सरतापे, विशाल माने, किरण काळेल, बापुसो मिसाळ,बशीर मुल्ला,सुशील त्रिगुणे, विठ्ठल काटकर,विवेक भागवत, बाळासाहेब मुलाणी, बाळासाहेब सारतापे,संतोष देशमुख,बशीर मुल्ला,दिलीप मेंढापुरे ,यांच्यासह सुमारे चारलाख भाविकांनी सिद्धनाथाच्या रथावर गुलाल खोबर्‍याची उधळण केली

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular