म्हसवड: म्हसवड नगरीचे आराध्य दैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यात्रेच्या बंदोबस्ता साठी साताराहून आलेले पोलिस विकास सर्जेराव पवार (वय48) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने म्हसवड पोलिस ठाण्याच्या आवारात निधन झाले.
या बाबत म्हसवड पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी म्हसवड नगरीचे आराध्य दैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी रथोत्सवाचे बंदोबस्तासाठी सातारा येथील मोटार परिवहन विभागात नेमणुकीस असलेले व क्रेन नंबर चक 11Aइ 378 वरील चालक नामे विकास सर्जेराव पवार वय 48 बक्कल नंबर 527 हे सकाळी 9वाजणाच्या सुमारास पोलिस कॉन्स्टेबल विकास हणमंत जाधव यांचे बरोबर गप्पा मारत असताना पाणी व पित्ताची गोळी आणण्यास सांगितले त्यांना पाणी आणून दिले ते पाणी पिले असता त्यांना उलटी झाली त्यांनी परत पाण्याची बाटली आणायला सांगितली पाण्याने तोंड धुतले आणि जमिनीवर बसले असता अचानक तोंडावर पडले म्हणून त्यांना म्हसवड येथील धन्वंतरी हॉस्पीटल मध्ये नेले तेथील डॉक्टरनी तपासून ते मयत झाले असल्याचे सांगितले नंतर मयताची खबर म्हसवड पोलिस ठाण्यात देण्यात आली असून फिर्याद पोलिस कॉन्सटेबल अमोल मानसिंग मोरे यांनी दिला आहे. अधिक तपास सपोनि गणेश वाघमोडे करत आहेत.
म्हसवड यात्रा बंदोबस्तातील पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू
RELATED ARTICLES