म्हसवड : पानी फाऊंडेशनच्या मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोधवडे या गावी माझा समृद्ध गाव या उपक्रमांतर्गत निसर्गाची धमाल शाळा हा उपक्रम मोठया उत्साहाच्या वातावरणात सुरु झाला.
यावेळी पानी फाउंडेशनचे या उपक्रमाचे मास्टर ट्रेनर लव्हेश नाकती, माण तालुका समनवय्क संजय साबळे, लोधवडे गावच्या विद्यमान उपसरपंच मंदाकिनी कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार माने, सतेशकुमार माळवे, संतराम पवार, सुचिता माळवे मॅडम, दीपाली फरांदे मॅडम, मगर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी या उपक्रमाचे लोधवडे शाळेचे समनवय्क सतेशकुमार माळवे सर, मंदाकिनी कदम, राजकुमार माने, लव्हेश नाकती, संजय साबळे यांची भाषणे झाली तर यावेळी विविध प्रकारची पर्यावरणपूरक मनोरंजक गाणी, फणी गेम्स, घेतले गेले. याशिवाय काही व्हिडीओ क्लिप्सही दाखविण्यात आल्या. आजच्या या उपक्रमाच्या उदघाटन सोहळ्याचे प्रास्तविक व सूत्रसंचलन या उपक्रमाचे शाळा समनववय्क सतेशकुमार माळवे सर यांनी केले तर संतराम पवार सर यांनी आभार मानले.
लोधवडे प्राथमिक शाळेत रंगली निसर्गाची धमाल शाळा
RELATED ARTICLES