म्हसवड: माण ही नररत्नांची खाण असून क्रांतिवीर संकुलांमध्ये सर्वगुणसंपन्न आदर्श विद्यार्थी घडवले जातील असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत हणमंतराव जगदाळे यांनी म्हसवड येथे केले.
म्हसवड येथील क्रांतिवीर इंग्लिश मिडियम शाळेला नुकतीच हणमंतराव जगदाळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्था अध्यक्ष, विश्वंभर बाबर, संतोष घोडके, प्राचार्य के. के अनुरूप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना हणमंतराव जगदाळे म्हणाले क्रांतिवीर शैक्षणिक संकुल अल्पावधीत नावारूपास आले आहे. दूरदृष्टीतून या संकुलाची उभारणी केलेली आहे. आजवर या संकुलाने शालेय स्पर्धा परीक्षेत आपला वेगळा दबदबा निर्माण केलेला आहे.
माण हा दुष्काळी तालुका असला तरी बुद्धीचा मात्र येथे सुकाळ आहे. माणमध्ये अनेक प्रज्ञावंत; विचारवंत घडले तोच वारसा क्रांतिवीर संकुल जोपासेल अशी खात्री जगदाळे यांनी व्यक्त केली. खूप अभ्यास करा; अभ्यासाचे सुयोग्य नियोजन करा. यश तुमचेच असेल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. जिद्द व चिकाटी ठेवा, गुरुजन व आई वडिलांचा आदर ठेवा शाळेचे व आपल्या जिल्ह्याचे नाव वाढविण्यासाठी शिकून मोठे व्हा असे आवाहन जगदाळे यांनी केले.प्रास्ताविक संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल फुटाणे यांनी केले. उपस्थितांचे आभार सुवर्णा टाकणे यांनी मानले. यावेळी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
क्रांतिवीर संकुलामध्ये सर्वगुणसंपन्न आदर्श विद्यार्थी घडवले जातील: जगदाळे
RELATED ARTICLES