म्हसवड : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ संचालित कला व वाणिज्य अभ्यासकेंद्र, माण देशी फौंडेशन म्हसवड चा 4 था पदवीदान समारंभ माणदेशी संस्थेच्या मुख्य इमारतीत मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी या समारंभास संस्थापिका मा. चेतना सिन्हा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा(भाऊ), उपाध्यक्ष जवाहर देशमाने, प्राध्यापिका सुजाता वीर, अंजली भागवत, पूनम सोनवणे, विठ्ठल लवटे, सचिन बाबर व केंद्रपमुख बशीर मुल्ला आदि मान्यवर उपस्थित होते.
कला व वाणिज्य शाखेतून मे 2018 मध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 34 स्नातकांचा पदवीदान समारंभफ माण देशी संस्थेच्या प्रांगणात घेण्यात आला त्यावेळी श्रीमती चेतना सिन्हा म्हणाल्या कला व वाणिज्य पदवी अभ्यासक्रमा बरोबरच इतर वेगवेगळ्या शैक्षणिक संधी आपण या अभ्यासकेंद्रा मध्ये पुरविणार आहोत. माण देशी महिलासंठी इतर कोर्सेस सुरु करण्याबाबत आपण स्वतः नाशिक विद्यापीठात जावून मा.कुलगुरूंची भेट घेणार असून इमारतीच्या वरच्या मजल्यावर संपूर्ण असे सर्व सोयींनीयुक्त शैक्षणिक दालन सुरु करणार आहोत. त्याचबरोबर आज माण देशी अभ्यासकेंद्रात महिलांची संख्या जास्त असून पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक ग्रामीण महिलांनीच पटकविला असल्याने याचा मला सार्थ अभिमान आहे.
कला शाखा पदवी प्रथम क्रमांक सारिका खांडेकर (खडकी पाटोळे), द्वितिय क्रमांक पार्वती शिंदे (पर्यंती), व तृतीय क्रमांक जयश्री वाघमारे (पुळकोटी) यांनी मिळवला. त्याच बरोबर वाणिज्य शाखा प्रथम क्रमांक सतीश माने (म्हसवड) याने मिळविला. अशाप्रकारे मे 2018 परीक्षे मध्ये माण देशी अभ्यासकेंद्रातील एकूण 34 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले व 13 गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. माण देशी अभ्यासकेंद्रा- तील विद्यार्थ्यांना प्रोस्ताहित करण्यासाठी एक्सेन्चर सर्विसेस प्रा.लि. संस्थेकडून मदत होत आहे शिवाय कॉमन वेल्थ ऑफ लर्निंग संस्थेच्या वतीने यंग गर्ल्स अंतर्गत प्रवेश दिला जात आहे. याचा मोठा फायदा माण देशी अभ्यासकेंद्रातील ग्रामीण महिला विद्यार्थिनीना होत आहे.
यावेळी बोलताना उपाध्यक्ष जवाहर देशमाने म्हणाले कि, शेती, घरप्रपंच, व्यवसाय पहात पदवी घेणे हि कौतुकाची बाब आहे. हे फक्त माण देशी मध्येच घडू शकते कारण या विर्द्यार्थ्याना प्राध्यापिका अंजली भागवत, सुजाता वीर, पूनम सोनवणे, विठ्ठल लवटे, सचिन बाबर व केंद्रप्रमुख बशीर मुल्ला यांचे सामंत्रण व मार्गदर्शन योग्य प्रकारे लाभत आहे. त्यामुळे शेकडो ग्रामीण महिलांचे पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.
एकूणच माण देशी अभ्यासकेंद्रातून दिल्या जाणार्या सेवा सुविधा बाबत विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले कि महिलांना रविवारच्या तासाला हजर राहण्यासाठी येण्याजाण्याचा प्रवास खर्चही दिला जातो त्याचबरोबर शैक्षणिक सहल, गरीब विर्द्यार्थी सहाय्य निधी, स्कॉलरशिप या सारख्या सर्व विद्यापीठच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. हा पदवीदान समारंभ यशस्वी करण्यासाठी माण देशी फौंडेशन संस्थेच्या सर्व सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राध्यपिका अंजली भागवत यांनी केले.
माण देशी फौंडेशन म्हसवडचा पदवीदान समारंभ उत्साहात
RELATED ARTICLES