Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीजांभुळणी गावात जातीय शांतता राखण्याचे आवाहन

जांभुळणी गावात जातीय शांतता राखण्याचे आवाहन

म्हसवड : जांभुळणी (ता. माण) येथील समाजउन्नती मंडळाच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त काढण्यात आलेली मिरवणूक जयंतीमध्ये येऊन गावातील जातीयवाद्यानी आडवून जातीवाचक शिवीगाळ करून दगडफेक करून तरूणास मारहान केल्याच्या कारणावरून म्हसवड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात अ‍ॅट्रसिटीचा गुन्हा फिर्यादी माधुरी दादासो तोरणे या महिलेने दाखल केला असून, गावात जातीय शांतता रहावी म्हणून डीवायएसपी अनिल वडनेरे यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की 29 एप्रिल रोजी जांभुळणी ता माण येथील समाजउन्नती मंडळाच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त गावातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महाकारूणी भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती.
ही मिरवणूक जयसिंग काळेल यांचे घरासमोरून चाललेली अफताना अचानक गावीतील आप्पा गुलाब काळेल, दत्ता विलास काळेल, जयसिंग काळेल, नवनाथ गुलाब काळेल, बंडू काळेल व इतर 8ते9जण अचानक मिरवणूकी मध्ये आले व महारग्यानो मिरवणूक शांततेत काढा कशाला धिंगाणा लावलाय असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी देत मिरवणूकीमध्ये दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. व सुशिल दादासो तोरणे यास शिवीगाळ करत हातानं तसेच लाथा बुक्क्यांनी मारहान केली. या वेळी गावचे पोलिस पाटील सुभाषराव काळेल यांनी सदर भांडण मिटवली.
दुसर्‍या दिवशी 30एप्रिल रोजी सकाळी गावातील प्रतिष्ठित मंडळीनी बैठक घेऊन सदरचा वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलापरंतू वाद न मिटल्याने बौध्द समाज बांधवांनी महिला सह म्हसवड पोलिस ठाण्यात धाव घेतली व रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.असून पुढील तपास डीवायएसपी अनिल वडनेरे करत आहेत. 1 मे या दिवशी डीवायएसपी अनिल वडनेरे म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि मालोजीराव देशमुख यांनी जांभुळणी गावास भेट देऊन सर्व ग्रामस्थांची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले, यावेळी पोलिस पाटील सुभाषराव काळेल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular