मुंबई : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये 42 व बीड जिल्ह्यात 10 तरुणांनी बलिदान दिले जेव्हा बलिदान केले तेव्हा त्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकार्यानी व संबधित अधिकारी यांनी सरकारशी चर्चा करून बलिदान करणार्याच्या कुटुंबियांना 10 लाख व कुटुंबातील एकास नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिले होते, परंतु या गोष्टी ला 9-10 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. सरकारने काहीच तरुणांच्या कुटुंबियांना अर्धवट मदत करण्याचे काम केलेले आहे.
आज विधानपरिषदे मध्ये औचीत्याच्या मुद्याद्वारे या प्रश्नाला आ. विनायकराव मेटे यांनी वाचा फोडून मराठा तरुणांनी समाजासाठी बलिदान दिलेले आहे माझ्या बीड जिल्ह्यात 10 तरुणांनी समाजासाठी जीवन संपविले, सरकारशी, मुख्यमंत्री यांच्याशी, सचिवांशी व जिल्हाधिकारी यांना मी स्वता: त्यावेळी बोलेलो होतो, आणि बलिदान करणार्या कुटुंबातील एकाला नोकरी व 10 लाख रुपयांचे लेखी आश्वासन दिलेले असताना हि शासनाकडून फक्त 5 लोकांनाच प्रत्येकी 5 लाख रुपये मदत मिळाली आहे. इतर लोकांवर मात्र अन्याय सुरूच असून नोकरीच्या बाबतीत सरकार बोलायला तयार नाही. हि फसवणूक असून सभागृहामध्ये सभागृहाचे नेते आणि मराठा समितीचे अध्यक्ष ना. चंद्रकांत दादा पाटील हजर होते त्यांनी ताबडतोब यामध्ये लक्ष घालून बलिदान करणार्याच्या कुटुंबियांना त्वरित पैसे व नोकरी देण्याची तयारी करावी असे आ.मेटे म्हणाले. ना. चंद्रकांत दादा पाटील यांनीही यावर ताबडतोब न्याय दिला जाईल असे सांगितले आहे. यामुळे लवकरच सर्व कुटुंबियांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही.
‘मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्या युवकांच्या कुटुंबियांना मिळणार मदत’
RELATED ARTICLES

