पंढरपूर: येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची 112 वी जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रसाद सातपुते यांच्या हस्ते झाले. प्रसाद सातपुते म्हणाले की, भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे बंदी जीवन हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे.
ऑस्कर वाइल्डचे वीरा-दी निहिलिस्ट, क्रोपोटकिनचे मेमॉयर्स, मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी विक्टर ह्युगोची मला मिझरेबल, हॉलकेनचे इटर्नल सिटी, अप्टन सिंक्लेअरची क्राय फॉर जस्टिस, रॉस्पिनची व्हॉट नेव्हर हॅपन्ड, गॉर्कीची मदर ह्या कादंबर्याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे. असे त्यांचे मत होते. त्यांनी सावरकर लिखित मॅझिनीचे चरित्र, फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य देखील अभ्यासले होते. असे सांगून भगतसिंगांच्या अनेक घटना सांगितल्या. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम. पवार, राकेश साळुंखे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची 112 वी जयंती साजरी
RELATED ARTICLES

