Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीसज्जनगड परळी पायरी मार्ग धोकादायक

सज्जनगड परळी पायरी मार्ग धोकादायक

परळी : परळी येथून सज्जनगडावर जाणारा पायरी मार्ग धोकादायक बनला असून पावसाळ्यात मोठ मोठे दगड पायरी मार्गावर आले असून अनेक ठिकाणी पायरी मार्ग खचला आहे.
परळी येथून गडावर जाण्यासाठी पुरातन पायरी मार्ग आहे या मार्गावरून श्री समर्थ रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी उरमोडीच्या डोहातून गडावर मोठ्या हंड्यातून पाणी नेहत. असा इतिहासात उल्लेख काही डांबरी रस्ता होण्या अगोदर सज्जनगडावर अन्नधान्य दैनंदिन गरजेच्या वस्तू या पायरी मार्गाने गडावर ने आण केली जात असे पण अलीकडे काही वर्षे या मार्गावर स्थानिक प्रशासनाचे तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने हा मार्ग इतिहासकालीन होण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी पावसात विसाव्याच्या छपर्‍या पायरी मार्गाची दुरवस्था होत आहे मात्र त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष आहे.
या वर्षीही गाय मुखाच्या खाली असलेल्या वळणावर दरड कोसळल्या आहेत पायरी मार्ग धोकादायक बनला आहे इतिहासाचा ठेवा म्हणून हा मार्ग जपणे काळाची गरज आहे. पायरी मार्गाहून जाताना निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते उरमोडी धरणाची पाणी पातळी दिसते पक्ष्यांचा किलबिलाट निलगिरीची वटवृक्षांची झाडी दाट कळकांचे बेटातून मार्ग काढत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण येते

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular