Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीबोरणे गावचे शिवार दहा ते बारा फूट भेगाळले

बोरणे गावचे शिवार दहा ते बारा फूट भेगाळले

परळी : सातारा शहराच्या पश्चिमेकडील परळी खो़र्‍यातील बोरणे येथील गवतपड डोंगरामध्ये दहा ते बारा फूटांच्या भेगा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सज्जनगड मार्गाहून थोडे पुढे गेले की बोरणे हे गाव आहे. हा भाग अतिवृष्टीच्या पट्टयात येतो. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची संततधार असल्याने मोठे नुकसान झाले आहे. बोरणे येथे गेल्या चार ते पाच दिवसांपासून गावाच्यावर असलेली तसेच उत्तरेकडील गवतपड जमीनीला भेगा पडल्या आहे. भेगाळलेले डोंगरांचे अंतज जवळपास 2 किलोमीटर इतके आहे.
शिवारातील भेगा दहा ते बारा फूट खोल असल्याने यांना पाहिल्यावर ग्रामस्थांमध्ये थरकाप उडत आहे. या डोंगराला भेगा पडल्याने डोंगरावरील महाकाय दगड ही गावच्या दिशेने कधी झेपावतील हे सांगता येत नाही. तसेच पांगारे फाटा ते राजापुरीमार्ग असा एकूण 2 किलोमीटर अंतरावरील डोंगर भेगाळल्याने या गावचे माळीण तर होणार नाही ना अशी भिती ग्रामस्थांमध्ये दिसत आहे.
मोरेवाडी, बेंडवाडी, या गांवांसारखे आमचे संसार भेगाळणार नाहीत ना अशी चिंता हि भेडसावत आहे. पांगारे बोरणे येथील डोंगरांबरोबर रस्त्यांना देखील भेगा पडल्या आहेत. तसेच काही ठिकाणी रस्त्यालगतचा मातीचा भराव खचत असल्याने येथील वाहतूकही धोकादायक झाली आहे. या रस्त्याची वाहतूक बंद झाल्यास सांडवली बोरणे, पांगारे, ठोसेघर, जांभे, चिखली, चाळकेवाडी अशा कित्तेक गावांचा संपर्क तुटणार आहे. तसेच पावसाळा सुरु झाला की हजारो पर्यटक ठोसेघर धबधबा, चाळकेवाडीचे पवनचक्की पठार येथील निसर्ग सौंदर्य डोळयात सामावून घेण्यासाठी येत असतात. परंतु येथील घाट रस्त्यांची अवस्था पाहता पर्यटनावर देखील याचा परिणाम होणार हे नक्की.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular