परळी : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी परळी शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. इ. 4थीच्या वर्गातील मुलांनी शिक्षकांची भूमिका केली.
दीपक लाभाते सर यांनी छात्रशिक्षकांना शाळेतील कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी खेळ, गाणी गोष्टी यांतून शिकवण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा यासाठी शाळा वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत असते. डॉ. सचिन यादव वैद्यकीय अधिकारी परळी यांनी शाळेस भेट देऊन शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षकदिनाच्या
निरोप समारंभ प्रसंगी कु.श्रावणी राऊत हिने भावी काळात शिक्षक बनून समाजाची सेवा करेन असे मत व्यक्त केले. मनिषा सोनवणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
परळी शाळेत शिक्षक दिन साजरा
RELATED ARTICLES

