Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीअभयसिंहराजे भोसले विद्यालयाची विभागस्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड

अभयसिंहराजे भोसले विद्यालयाची विभागस्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड

परळी : सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांच्या मार्फत आयोजित शालेय 14 वर्षाखालील खो-खो जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले विदयालय सोनवडी गजवडी या संघाने जिल्हा अजिंक्यपद पटकावले. शिवनगर (ता. कराड) येथे जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. सांगली येथे होणार्‍या विभागस्तरीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे.
शिवनगर (ता. कराड) येथे जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. प्रथम सोनवडी गजवडी संघाने फलटण गिरवी संघाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या सामन्यामध्ये माण संघाचा 1 डाव 4 गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना शिवनगर ता. कराड व सोनवडी गजवडी या संघामध्ये अतिशय चुरशिचा झाला. दोन्ही संघाने अतिशय सुंदर खेळाचे प्रदर्शन करत सामना बरोबरीत सोडविला. पुन्हा 7 मिनिटांचा अतिरिक्त डावामध्ये सोनवडी गजवडी संघाने 3 गुणांनी विजय मिळवत जिल्हा विजेतेपद मिळविले. सामना पाहण्यासाठी आलेल्या सातारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी श्री. कर्णे यांनी सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे विशेष कौतुक केले .
विजयी संघाला संस्थेचे अध्यक्ष अरविंद जाधव, सचिव लक्ष्मण झणझणे, खजिनदार माधवराव कदम, संचालक धनाजी कदम, युसुफ पटेल, राजेंद्र कारंडे, महादेव खामकर, धोंडीराम कदम, शिवाजी कदम तसेच विदयालयाचे मुख्याध्यापक शिवाजी जाधव, पर्यवेक्षक दिलीप खामकर क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर जांभळे, निलकंठ तोडकरी, पांडुरंग सुतार ,दयानंद पवार, शशिकांत गाढवे, सुनिल शिंदे, चंद्रकांत धर्माधिकारी तसेच सोनवडी गजवडी दोन्ही गावचे सरपंच, पोलिस पाटील तसेच भोंदवडे मानेवाडी, कारी, कुस, बनघर, परळी, सोनवडी, गजवडी गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले. यशस्वी विदयार्थाना महेंद्र गाढवे, माजी खो-खो खेळाडू प्रणित कदम, चेतन कदम, ओंकार कदम, अक्षय लोकरे, सुरज कदम, अमित कदम यांचे मार्गदशन लाभले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular