परळी : जावली तालुक्यांमधील प्रत्येक गावामध्ये जन्ममृत्यू वेळी पर्यावरण संवर्धनासाठी एक रोप लावणे हा एक स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन जावली तालुका पंचायत समितीचे उपसभापती दत्ता गावडे यांनी सौ. सुनीता प्रकाश गावडे यांची सावडण्याचा विधी प्रसंगी केले.
खर्शी बारामुरे येथील रहिवासी सुनीता प्रकाश गावडे यांचे अपघाती निधन झाले. त्यांचे सावडने विधी प्रसंगी त्यांचे पती प्रकाश गावडे यांचे हस्ते स्मशानभूमी परिसरात प्रथमच एक वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले मैत्री फाउंडेशन यांच्यावतीने व उपसभापती दत्ता गावडे यांचे प्रेरणेने वनसंरक्षण व पर्यावरण संवर्धन चळवळीची सुरुवात यावेळी केली सदरची चळवळ संपूर्ण जावली तालुक्यातील प्रत्येक गावात राबविण्याचा मानस उपसभापती दत्ता गावडे यांनी या प्रसंगी केला.
जन्म मृत्यू वेळी वृक्षारोपण एक स्तुत्य कार्यक्रम : उपसभापती दत्ता गावडे
RELATED ARTICLES

