वार्ताहर
परळी
ग्रामपंचायत गवडी व प्राथमिक आरोग्य केंद्र कण्हेर यांच्या वतीने दि.25.07.21 रोजी लसीकरण मोहित राबविण्यात आली होती.. यामध्ये 45 वर्षावरील दुसरा डोस, 45 वर्षावरील पहिला डोस व दुसरा डोस तसेच 18 ते 45 वर्षा वरील पहिला डोस अश्या प्रकारे लसीकरण करण्यात आले.. सुमारे 200 डोस देण्यात आले..या मध्ये गवडी गावातील तसेच पंचक्रोशीतील लोकांनी लसीकरनाचा लाभ घेतला..यावेळी ग्रामपंचायत गवडी सरपंच कमल घोरपडे, उपसरपंच निलेश घाडगे, सदस्या गौरी घोरपडे, आशा घाडगे ,संजय सोनावणे, बजरंग घोरपडे,शशीकांत शेलार,प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते