Thursday, October 16, 2025
Homeठळक घडामोडीपावसाच्या दैयनिय अवस्थेत पाटण येथे निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज.

पावसाच्या दैयनिय अवस्थेत पाटण येथे निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज.

पाटण:- गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेल्या पाऊसात शनिवारी सायंकाळी निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा मात्र भर पाऊसात सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी सकाळ पासून पाटण परिसरात पाऊसाचा जोर वाढला असताना अशा पाऊसात मतदानासाठी झालेल्या तयारीत शासकीय यंत्रणेची मात्र तारांबळा उडाली. येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या मैदानावर २६१ पाटण विधानसभा व ४५ सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शासकीय यंत्रणेची जय्यत तयारी सुरु असताना यासाठी उभा केलेला मंडप पाऊसाने अनेक ठिकाणी पडला तर मैदानावर सगळीकडे चिखल झाला. वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. अशा परस्थितीत व भर पाऊसात निवडणूक कर्मचारी, अधिकारी आपले कर्तव्य बजावताना दिसत होते.

२६१ पाटण विधानसभा मतदार संघासाठी व ४५ सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदार संघासाठी संपूर्ण तयारी झाली असुन सोमवार दि. २१ रोजी होणाऱ्या ३९७ मतदान केंद्रासाठी सरासरी ३ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर १५० जीपसह विविध गाड्या, ४ ट्रक, ४४ एसटी बस असे एकूण १९८ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. मतदान करताना मतदाराला छायाचित्र असणारे ११ पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. तर मतदान केंद्रात दोन मतदान यंत्र ठेवण्यात येणार असून एक यंत्र लोकसभा निवडणुकीसाठी असेल तर दुसरे विधानसभा निवडणुकीसाठी असणार आहे. जनतेने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे. निवडणूक कालावधीत एखाद्या कर्मचाऱ्याने हलगर्जीपणा केला अथवा आचार संहितेचा कोणी भंग केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच पाटण विधानसभा व सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल गुरवार दि.- २४ रोजी सातारा येथे सकाळी ८ वा. पासून सुरू होणार आहे. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी सांगितले.

या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी १० भरारी पथके, ४ स्थिर (तळमावले, निसरे, कोयनानगर, तारळे), व्हिडीओ सर्विलन्स ३, व्हिडीओ व्हीव्ही टीम १ अशा एकूण १८ पथकांची नेमणूक केली आहे. मतदान यंत्रे व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी १५० जीपसह विविध गाड्या, ४ ट्रक, ४४ एसटी बस असे एकूण १९८ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. अपंग मतदारांसाठी ९० ऍटोरिक्षांची सोय करण्यात आली असून २२१ व्हिल चेअरची सोय केली आहे. तसेच येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात मतदान यंत्र वाटप व स्विकारण्यासाठी एकूण २७ टेबल ठेवण्यात आले असून त्यासाठी १३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

४५ लोकसभा मतदारसंघातील ३९८ मतदान केंद्रांपैकी १० टक्के प्रमाणे सुमारे ४० मतदान केंद्रांवर ऑनलॉईन यंत्रणा बसविण्यात आली असून त्यामार्फत प्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवता येणार आहे. तसेच ईव्हीएम मशिन वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस बसविण्यात येणार आहे.

मतदान करताना मतदाराला ११ छायाचित्र असणारे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स, शासनाचे कार्ड, बॅंक पासबूक, पॅनकार्ड, आधारकार्ड, स्मार्ट कार्ड, मनेरेगा (रोजगार) कार्ड, हेल्थ कार्ड, इन्श्युरन्स कार्ड, पेन्शन कार्ड या ओळखीच्या पुराव्यांचा समावेश असल्याची माहिती देवून निवडणूक कालावधीत एखाद्या कर्मचाऱ्याने हलगर्जीपणा केला अथवा आचार संहितेचा कोणी भंग केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल,

४५ सातारा लोकसभा पोट निवडणुकीसाठी मतदासंघ आणि २६१ पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण ३९८ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये कराड तालुक्यातील (३९४ अ) पाडळी केसे या सहाय्यक मतदान केंद्रांचा समावेश आहे.  मतदारसंघात १ लाख ५० हजार ३०६ पुरूष मतदार आणि १ लाख ४७ हजार ७७४ महिला व तृतीयपंथी १ मतदार असे एकूण २ लाख ९७ हजार ७८१ मतदार आहेत. त्यापैकी १ हजार ४८४ दिव्यांग मतदार आहेत. नवीन वाढीनुसार सरासरी ३ लाख मतदारांची संख्या पाटण विधानसभा मतदार संघात आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular