* मतदारांची संख्या वाढली मात्र 4% ने टक्का घसरला * उमेदवारांच्यात धाकधूक
(शंकर मोहिते)
पाटण : अटीतटीच्या समजल्या जाणार्या पाटण विधानसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणूकीपेक्षा मतदारांची संख्या वाढली असताना मात्र 2019 चालू विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदारांचा टक्का 4% ने घसरला आहे. 2014 च्या निवडणुकीत पाटण मतदार संघात एकूण 72% मतदान झाले होते. तर तेच मतदान 2019 च्या निवडणुकीत 67.73% मतदान झाले आहे.
सरासरी हि टक्केवारी 68 % आहे. हा घसरलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पत्त्यावर पडणार हे गुरवारी होणार्या निकालाअंती समोर येणार आहे. सद्यातरी शिवसेनेचे उमेदवार शंभुराज देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांनी आपणच निवडून येणार असल्याचा विश्वास मतदारांना बोलून दाखवला असला तरी या निकालासाठी त्यांच्या मनात धाकधूक सुरू झाली आहे.
पाटण विधानसभा मतदार संघात एकुण 2 लाख 99 हजार 929, मतदारांपैकी 2 लाख 03 हजार 129 मतदारांनी मतदान केले आहे. यापैकी पुरुष मतदारांची संख्या- 1 लाख 04 हजार 316 इतकी आहे. तर महिला मतदरांची संख्या- 98 हजार 813 इतकी आहे. मागील विधानसभा निवडणूकीपेक्षा 15 हजार 587 पुरुष मतदरांची संख्या वाढली आहे. तर 10 हजार 492 महिला मतदारांची संख्या वाढली आहे. 2014 साली 88 हजार 729 पुरुष मतदारांनी मतदान केले होते. तर 88 हजार 321 महिला मतदारांनी मतदान केले होते. एकुण मतदान – 1 लाख 77 हजार 050 ऐवढे झाले होते. मागील निवडणूकीपेक्षा 26 हजार 079 जादा मतदारांनी मतदान केले असून या निवडणुकीत हि संख्या- 2 लाख 03 हजार 129 ऐवढी आहे.
वरील सर्व आकडेवारी पहाता 2019 विधानसभा निवडणूक कोणाच्या पत्त्यावर पडणार हि उत्सुकता मतदारांच्यात लागली आहे. असे असताना मल्हारपेठ, मारुल हवेली हे विभाग लोकसभेच्या मतदानाबरोबर आ. शंभुराज देसाई यांना किती साथ करेल याबरोबर मोरगिरी, तारळे, ढेबेवाडी हे विभाग देखील आ. देसाई यांना कीती तारणार तर कोयना, पाटण, चाफळ हे विभाग सत्यजितसिंह पाटणकर यांच्या बाजूने किती उभे राहणार यावर निवडणूक अवलंबून राहिली असली तरी या निवडणूकीचा निकाल कुंभारगाव, तळमावले, काळगाव तर नव्याने जोडलेल्या तांबवे, सुपने या विभागाच्या निकालावर अवलंबून राहिला आहे.
पाटण विधानसभा मतदार संघात घसरलेला टक्का कोणाच्या पत्त्यावर?
RELATED ARTICLES