Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीमनसेचे एल अ‍ॅण्ड टी कंपनी विरोधात उपोषण

मनसेचे एल अ‍ॅण्ड टी कंपनी विरोधात उपोषण

प्रशासनाचे दुर्लक्ष: रस्त्याच्या कामाबाबत कंपनीचा मनमानी कारभार
पाटण: पाटण तालुक्यामध्ये सुरु असलेले कराड चिपळूण राज्य महामार्गाचे काम गेल्या दोन ते अडीच वर्षापासून सुरु आहे. एल अँण्ड टी कंपनीने व बांधकाम विभागाने आपला मनमानी कारभार सुरु केला असून अनेक ठिकाणी रस्ता खोदून नागरिकांची गैरसोय केलेली आहे.
याबाबत अनेकवेळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाला लेखी व तोंडी सांगून देखील कंपनीच्या कामामध्ये काहीही सुधारणा झाली नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना 26 डिसेंबर रोजी पाटण तहसिल कार्यालय या ठिकाणी उपोषण करणार असल्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी प्रसिद्ध पत्रकार परिषदेत दिला.
पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना गोरख नारकर पुढे म्हणाले की, एल अँण्ड टी कंपनीचा मनमानी कारभार चालला असून त्यांच्या वरती कोणाचा अंकुश नाही. प्रशासन ही फक्त डोळेझाक पणा करत असून मनसे ने याबाबत प्रशासनाला ही वेळोवेळी सांगितले होते परंतु कंपनीच्या कामामध्ये रेंगाळलेली स्थिती तशीचं आहे. कंपनीने तांबवे सुपन्या पासून अगदी कोयनेपर्यंत रस्ता ठिकठिकाणी खोदुन ठेवलेला आहे.
रस्त्यांची कोणतीही एक बाजू वाहतूकिसाठी खुली न करता रस्त्याच्या दोन्ही बाजू खोदून ठेवलेल्या आहेत. तसेच मोठं मोठे दगड तसेच जिथे काम सुरु आहे. तिथे सूचना फलक किंवा संरक्षक उपाययोजना ही केलेल्या नाहीत.
अशा परिस्थितीत या रस्त्यावरुन ये जा करत असताना अनेकांचे छोटे मोठे अपघात झालेले आहेत तसेच गरोदर महिलांना या रस्त्यावरुन ये जा करणे ही अत्यंतधोकादायक बनले आहे. एखादा अतिगंभीर रुग्ण असेल त्याला तातडिने कराडला घेऊन जायचे आहे तर तो या रस्त्यावरुन ये जा करताना त्याला मध्येचं आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. कंपनीने रुग्णवाहिका नागरिकांच्या सोई साठी ठेवलेल्या आहेत मग त्या रुग्णवाहिका नेमक्या आहेत कुठे? कंपनीच्या रुग्णवाहिकेचा एका तरी रुग्णास फायदा झालेला आहे काय? अनेक अपघात हे फक्त आणि फक्त या रस्त्याच्या रेंगाळलेल्या कामामुळे झालेले आहेत.
तसेच रस्त्याचे काम सुरु असताना कोणतीही एक बाजू पूर्ण न करताना सगळा खोदून ठेवलेला आहे. अनेक दुचाकि स्वारांना श्वसनाचे गंभीर आजार झालेले आहेत. ज्यांचे अपघात झाले त्यां गोरगरिब जनतेला कसलीही आर्थिक मदत ही झालेली नाही त्यांची कोणी साधी विचारपूस ही केलेली नाही. तसेच कराड ला ये जा करणारे अनेक नोकरदार मंडळींनी नोकरीला राजीनामा दिला आहे तर अनेकांनी पाटण सोडून कराडला स्थलांतरीत होणं पसंद केलेले आहे. या रस्त्याच्या कामाच्या संथगतीने सुरु असलेली वाटचाल ही मुद्दाम सुरु आहे. प्रशासन ही याकडे गांभिर्याने पाहत नाही तसेच कंपनीलाला वेळोवेळी सांगून ही फक्त खोटी आश्वासने देण्याची कामे या कंपनीने केलेली असून वेळोवेळी सूचना देऊनही कोणत्याही गोष्टीची पूर्तता केलेली नाही. अशी एक ना अनेक कारणांनी या कंपनीचा मनमानी कारभार तर सुरुचं आहे.
परंतु प्रशासन ही यास पाठीशी घालत आहे हे अत्यंत चूकिचे आहे. लोकांच्या सेवेसाठी न राहतात लोकांना नाहक त्रास देण्याचे उद्योग कंपनीने व बांधकाम विभागाने सुरु केलेले आहेत. लोकांना कोणी वाली नाही असं समजणं चूकिचं आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना 26 डिसेंबर पासून पाटण तहसिल कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहे. यावेळी संजय सत्रे, चंद्रकांत बामणे, दयानंद नलावडे, हणमंत पवार, राहूल संकपाळ, संभाजी चव्हाण, जितेंद्र कवर हे उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular