पाटण: ग्रामीण भागातून प्रशासकीय सेवेत जाणार्या युवकांसाठी किंगमेकर अॅकॅडमीने विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. भारतीय सैन्य दलासह पोलीस भरती, पोलीस उपनिरिक्षक या पदांवरील शासकीय सेवेत ग्रामीण भागातील मुले भरती होत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. भरती झालेल्या युवक-युवतींनी पाटण तालुक्याचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलासराव माने यांनी केले.
सुरूल (ता. पाटण) येथील किंगमेकर अॅकॅडमी व पाटण तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सैन्य दलात निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी व पोलीस उपनिरिक्षक पदी निवड झालेल्या रुपाली साळुंखे यांच्या सत्कार प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पांडुरंग ऐवळे व इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. राम कांबळे उपस्थित होते. यावेळी सरपंच सुमन संकपाळ, प्रा. सुरेश राजेमहाडीक, पत्रकार जालिंदर सत्रे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष योगेश हिरवे, सचिव विद्या नारकर, शहर प्रमुख नितिन खैरमोडे, संजय कांबळे, सुरेश संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.पांडुरंग ऐवळे म्हणाले, किंगमेकर अॅकॅडमीच्या माध्यमातून पाटणसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी शासकीय सेवेत जात आहेत ही अभिमानाची बाब आहे. कोणतेही उद्दीष्ट साध्य करण्यासाठी ध्येय डोळ्यासमोर असले पाहिजे आणि ते ध्येय प्राप्त करण्याची जिद्द आत्मसात केली पाहिजे. ध्येय नसेल तर आपण भरकटणार. ध्येय निचित करा. आज ग्रामीण भागातील मुलेही अधिकारी होत आहेत. शहरी आणि ग्रामीण यामध्ये फारसा फरक राहिला नाही. अभ्यासाला तंत्राची जोड द्या. वाचन चिंतन, श्रवण, मनन, भाषण, भ्रमण करा. विचारांची आदान प्रदान झाले पाहिजे. ध्येयात सुस्पष्टता असली पाहिजे. आवाक्यातील असणारी स्वप्ने पहावी. वास्तवात जगायला शिकले पाहिजे. वेळेची मर्यादा पाळा. पुस्तकाच्या पानाशिवाय आयुष्य नाही, असे त्यांनी सांगितले.
राम कांबळे म्हणाले, आपल्याच कुटुंबातील व्यक्तींसमोर आणि ऍकॅडमीसमोर सत्कार होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. तुमची स्वप्ने कागदावर लिहून पाठपुरावा करा. शहरी भागात जे काम होते ते काम सुरुल सारख्या ग्रामीण भागातील किंगमेकर अकॅडमी करत आहे, हि बाब अभिमानास्पद आहे.
प्रारंभी किंगमेकर अकॅडमीची प्रशिक्षणार्थी रुपाली साळुंखे व तेजस्विनी थोरात यांची पीएसआय तर आकाश संकपाळ व सागर बोर्गे यांची इंडियन आर्मीत निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. पांडुरंग ऐवळे, प्रा. डॉ. राम कांबळे, रुपाली साळुंखे, तेजस्विनी थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक जयवंत संकपाळ यांनी प्रास्ताविकाकेले. ऍकॅडमीचे संस्थापक विकास संकपाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. काजल सत्रे हिने सुत्रसंचालन केले. अजित चोरगे यांनी आभार मानले.
किंगमेकर अॅकॅडमीने युवकांच्यात विश्वासाचे स्थान निर्माण केले: विलासराव माने
RELATED ARTICLES