पाटण :- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमित बुधवार दि. ५ औगस्ट २०२० रोजी दुपारी ठिक १२ वा सुमारास श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. या इतिहासीक क्षणी पाटण येथील रामापूर याठिकाणी साधूमहंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोयना, मोरणा, केरा, वांग, तारळी, उत्तर मांड आणि धारेश्वर तीर्थ या सप्त गंगेचा श्रीरामाला अभिषेक घालून श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या प्रसंगी पाटण शहरातील कारसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी पाटण – रामापूर येथे झालेल्या नियोजन बैठकीत सांगितले. सोशल डिस्टींगक्षणचे नियम पाळून झालेल्या या बैठकीत ते बोलत होते.
पाटण शहराला इतिहासीक वारसा आहे. रामापूर येथे कवरवाडी जुन्या पायवाट शेजारी जुने पुरातन श्रीराम मंदिर होते. या मंदिरात सांस्कृतिक व धार्मिक परंपरा राखली जात होती. कालांतराने हे मंदिर पडले असताना येथील श्रीरामाच्या मूर्ती रामापूर येथील पाटणकर यांच्या जुन्या वाढ्यात ठेवण्यात आल्या. आजही मंदिराच्या मुळ ठिकाणी येथील नागरिक श्रध्देने नतमस्तक होतात. या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी येथील स्थानिक नागरिकांची अनेकवर्षा पासूनची इच्छा आहे. योगायोगाने संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन बुधवार दि.- ५ औगस्ट रोजी होत असताना हा इतिहासीक क्षण साधत रामापूर – पाटण येथील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन घेण्याचा निर्णय येथील स्थानिक नागरिकांनी घेतला आहे. हे भूमिपूजन साधू महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोयना, मोरणा, केरा, वांग, तारळी, उत्तर मांड आणि धारेश्वर तीर्थ या सप्त गंगेचा श्रीरामाला अभिषेक घालून सोशल डिस्टींगक्षणचे नियम पाळून मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. असे विक्रमबाबा पाटणकर यांनी सांगितले.