Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीरामापूर - पाटण येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन. साधूमहंताची उपस्थिती: सप्त गंगेचा अभिषेक

रामापूर – पाटण येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन. साधूमहंताची उपस्थिती: सप्त गंगेचा अभिषेक

रामापूर – पाटण येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन.
साधूमहंताची उपस्थिती: सप्त गंगेचा अभिषेक.

पाटण :- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमित बुधवार दि. ५ औगस्ट २०२० रोजी दुपारी ठिक १२ वा सुमारास श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. या इतिहासीक क्षणी पाटण येथील रामापूर याठिकाणी साधूमहंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोयना, मोरणा, केरा, वांग, तारळी, उत्तर मांड आणि धारेश्वर तीर्थ या सप्त गंगेचा श्रीरामाला अभिषेक घालून श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या प्रसंगी पाटण शहरातील कारसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी पाटण – रामापूर येथे झालेल्या नियोजन बैठकीत सांगितले. सोशल डिस्टींगक्षणचे नियम पाळून झालेल्या या बैठकीत ते बोलत होते.
पाटण शहराला इतिहासीक वारसा आहे. पाटणकर उर्फ साळुंखे घराणे हे स्वराज्यस्थापनेच्या पूर्वीपासूनच एक पराक्रमी घराणं म्हणून नावारुपास होते.साळुंखे हे त्यांचे पूर्वीचे आडनाव. पूर्वकालीन चालुक्य राजवंशातील या घराण्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर पाटण परगण्याची जहागिरी मिळवली.पुढे याच पाटण वरून त्यांना पाटणकर नाव पडले.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,छत्रपती राजाराम महाराज,छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात स्वराज्याच्या सेवेसाठी पिढ्यानपिढ्या मोलाचे योगदान दिले.
सरदार पाटणकर घराण्याचा वंशविस्तार सरदार नागोजीराव साळुंखे उर्फ पाटणकर,सरदार ज्योत्याजीराव साळुंखे,सरदार बहिरजीराव साळुंखे या मुळपुरुषांपासुन झालेला आपल्याला पहायला मिळतो. पुढे यांच्याच वंशातील सरदार हिरोजीराव पाटणकर, सरदार चांदजीराव पाटणकर,सरदार हणमंतराव पाटणकर,सरदार रामराव पाटणकर यांनी स्वराज्याची सेवा केली.वंशविस्तारामुळे सरदार पाटणकरांच्या शिक्केकरी वाडा पाटण, बीबी, केर, रामपूर,दिवशी बुद्रुक व खुर्द शाखा, सावंतवाडी, सातभाई(भाऊ) पाटणकर शाखा जांभूळवन, मनदुरे, वाजेगाव,ग्वाल्हेर या शाखा उदयास आल्या.
रामपूर शाखा हि ग्वाल्हेरकर सरदार पाटणकरांची पितृशाखा होय. रामपूर शाखेचे मुळपुरुष सरदार हणमंतराव पाटणकर हे सरदार चांदजीराव पाटणकरांचे कनिष्ठ बंधू.चांदजीराव व हणमंतराव हे दोन्हीही बंधु मोठे तलवारबहाद्दर.सरदार चांदजीराव यांनी 1692 मध्ये जिंजी मोहिमेत मोठा पराक्रम गाजवला यावर खुष होऊन छत्रपती राजाराम यांनी त्यांना संपूर्ण पाटण परगण्याची सनद दिली.अनेक मोहिमेत व उत्तरेकडील मुलुखांचा बंदोबस्त करण्यासाठी चांदजीराव हे आघाडीवर होते.आपल्या मोठ्या भावाप्रमाणेच सरदार हणमंतराव पाटणकर हे आपल्या तलवारीची धार दाखविण्यात मागे नव्हते.सरदार हणमंतराव यांच्या शौर्यावर खुष होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना समशेरबहादूर हा किताब दिला.याच हणमंतरावांनी रामपूर शाखेची स्थापना केली.या ठिकाणी पाटणकरांचा वाडा आहे.रामपूर शाखेला सरदार पाटणकर घराण्याची धाकटी पाती म्हणून ओळखले जाते.याच रामपूर शाखेतील वंशज सरदार हणमंतराव पाटणकर यांना तीन मुले. यापैकी हिरोजीराव-ग्वाल्हेर संस्थान, व्दारकोजीराव पाटणकर – पाटण संस्थान, धाराराव पाटणकर- दिवशी संस्थान अशी स्थापना झाली.
व्दारकोजीराव पाटणकर – पाटण संस्थान – यांना सात भाऊ- बाजीराव, जयरामराव, राघोजीराव, रामराव हे चार भाऊ युध्दात धारातीर्थी गेले. पैकी
लक्ष्मणराव- बडोदा (ग्वाल्हेर), बाळोजीराव- सावंतवाडी संस्थान, बाबुराव- पाटण (रामापूर) संस्थान. पाटण संस्थानातील बाबुराव ऊर्फ बापुसाहेब पाटणकर यांचे दत्तक पुत्र व्दारकोजीराव (कांता सरकार) हे हणमंतराव पाटणकर यांचे आठवे वंवशज यांच्या रामापूर येथील वाढयातील राम मंदिर भूमिपूजन. अयोध्येतील राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमाच्या प्रार्श्वभुमीवर होत आहे. हे श्रीराम मंदिर सार्वजनिक स्वरुपाचे राहणार असून मंदिराचा लोकार्पण सोहळा भूमिपूजन प्रसंगी सपन्न होत असल्याचे व्दारकोजीराव पाटणकर (कांता सरकार) यांनी सांगितले.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular